राज ठाकरे यांचे हिंदू समाजाला पत्र लिहून रोखठोक आवाहन
त्यांना आपली हनुमान चालिसा ऐकवा, सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलिस ठाण्यात नेऊन द्यावीत, मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या झाल्या पोलिसांसाठीच्या १०० या क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांच्या त्रासाबाबत तक्रार करावी, रोज करावी, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदू बांधवांना साद घालणारे पत्र लिहिले आहे.
संभाजीनगर येथे झालेल्या आपल्या सभेत राज ठाकरे यांनी सरकारला मुदत दिली होती की, ३ तारखेपर्यंत मी वाट पाहणार आणि ४ तारखेपासून मी ऐकणार नाही. मशिदींसमोर आम्ही हनुमानचालिसा म्हणू तेही दुप्पट आवाजात. त्या अनुषंगाने ३ मे रोजी राज ठाकरे यांच्या सहीचे पत्र रात्री व्हायरल झाले. हिंदू बांधव आणि भगिनींनो असे लिहित राज ठाकरे यांनी हे आवाहन केले आहे.
त्यात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखलाही दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे लोकवस्तीत १० डेसिबल ते जास्तीत जास्त ४५ ते ५५ डेसिबल म्हणजे कुजबुज करताना होणाऱ्या आवाजाएवढा ते घरातल्या मिक्सरएवढ्या आवाज याला परवानगी देण्यात आली आहे. जर अनधिकृत भोंग्यांना परवानगी देणार असाल तर हिंदू देवळांनाही भोंगे लावण्याची परवानगी द्या. हा विषय मुळात धार्मिक नसून सामाजिक आहे. देशातील सर्वधर्मियांना ध्वनिक्षेपकांमुळे त्रास होतोच. रस्त्यावर नमाज पढणं आणि वाहतूक कोंडी करणं हे कोणत्या धर्मात बसतं? म्हणून मुस्लिमधर्मियांना आवाहन आहे की, सामाजिक विषय समजून घ्या जर त्याला धार्मिक वळण दिलं गेलं तर आम्हीही त्याला धार्मिक वळण देऊ. त्यामुळे जिथे भोंगे अजान, बांग देतील तिथे भोंग्यांवर हनुमान चालिसा लावावी. भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे.
हे ही वाचा:
बुधवार, ४ मे रोजी श्रीमती शैलजा भातखळकर यांची शोकसभा
फरहान अख्तरला ‘तुफान’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
राज ठाकरें विरोधात पोलिसांची उत्तर सभा
राज ठाकरे यांच्या विरोधात लावली कोणती कलमे? वाचा सविस्तर
तीन पानी पत्राच्या शेवटी राज ठाकरे लिहितात की, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत असे सांगितले होते. त्यांचे आपण ऐकणार आहात की, तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षवादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला एकदा महाराष्ट्रातील जनतेसमोर होऊन जाऊ दे. देशात इतकी कारागृहे नाहीत की, तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल. तेव्हा हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो भोंगे हटविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधने झुगारून एकत्र या. आता नाही तर कधीच नाही.