राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा चर्चेत आहे. उत्तर प्रदेशमधून राज ठाकरे यांच्या दौऱ्याला मोठा विरोध होत असताना आता या दौऱ्यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती राज ठाकरे यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या स्वाक्षरीसह अयोध्या दौरा तूर्तास स्थगित असे लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. शिवाय महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलूच… असेही लिहिले आहे. त्याखाली त्यांनी रविवार, २२ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजता गणेश क्रीडा केंद्र, पुणे येथे मनसैनिकांना येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता रविवारी राज ठाकरे मनसैनिकांशी काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे. तसेच अयोध्या दौऱ्याविषयी राज ठकारे काय भूमिका घेणार याकडेही लक्ष असणार आहे.

राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून जय्यत तयारी सुरू होती. दरम्यान राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच त्यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. “आधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावं,” असे बृजभूषण सिंह म्हणाले होते. तर मुस्लिम पक्ष आणि बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनी देखील राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता.

हे ही वाचा:

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला

निखत झरीनची जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरी

आत्मनिर्भर 5G ची IIT मद्रासमध्ये यशस्वी चाचणी

आमच्याकडे तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याचेही संख्याबळ आहे

उत्तर प्रदेशमधून राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यात आला होता. तरीदेखील राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम होते. परंतु, आता मात्र, राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केला असल्याची माहिती दिली आहे.

Exit mobile version