जरांगें पाटलांचा बोलवता धनी कोण आहे? हे पाहावं लागेल

राज ठाकरेंचे वक्तव्य

जरांगें पाटलांचा बोलवता धनी कोण आहे? हे पाहावं लागेल

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला आरक्षण देण्यासाठी वेळ दिला आहे. पण, अशा प्रकारचं आरक्षण कधीही मिळणार नाही. असली कोणतीही गोष्ट होणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले. ही गोष्ट आपण जरांगे पाटील यांना तोंडावर सांगून आलेलो असंही राज ठाकरे म्हणाले. जरांगें पाटील यांचा बोलवता धनी कोण आहे? हे पाहावं लागेल, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.

जरांगे पाटील यांच्या पाठी असलेल्या व्यक्तीबद्दल वक्तव्य केल्यानंतर राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं आहे. जरांगे पाटील म्हणाले की, राज ठाकरें यांनीच तो शोधून काढावा, आणि त्याचं नाव त्यांनी लवरकच स्पष्ट करावं, या पाठीमागं कोण आहे ते सगळ्यांनी शोधलं आहे. आम्हाला पण सांगावं, त्यावेळी तुम्ही सांगाल ते आम्ही करतो. आम्हाला तर याचा शोध लागला नाही पण, यामागं फक्त आणि फक्त मराठा समाज आहे. मराठा सामाजाचं कल्याण व्हायला लागलं की, असे खोटे आरोप आणि पुड्या सोडल्या जातात. पंरतु मराठा समाज आता कोणाचंही ऐकणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळणार आणि आम्ही ते मिळवणार असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

फॅनला मारल्याप्रकरणी नाना पाटेकर यांची माफी!

उत्तरकाशी बोगद्यातील कामगारांच्या बचावासाठी दिल्लीहून आले ‘ऑगर ड्रिलिंग मशीन’!

शेहला रशीद म्हणते, काश्मीर म्हणजे गाझा नाही, श्रेय मोदी, शहांचे!

ऐश्वर्या रायबाबत वादग्रस्त विधान; पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाककडून माफी!

राज ठाकरे म्हणाले की, अशा प्रकारचं आरक्षण कधीही मिळणार नाही. असली कोणतीही गोष्ट होणार नाही. जरांगें पाटील यांच्या बोलवता धनी कोण आहे? हे पाहावं लागेल. जरांगे पाटील आहेत की त्यांच्यामागून कोण आहे. जातीय वादातून महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणुकीच्या पुढे हा वाद निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे मला या गोष्टी काही स्पष्ट वाटत नाहीत. कालातंराने कळेल की यामागे कोण आहे? असं राज ठाकरे म्हणाले.

Exit mobile version