‘अमरावतीची घटना पुन्हा घडली तर त्यांना सोडायचे नाही’

‘अमरावतीची घटना पुन्हा घडली तर त्यांना सोडायचे नाही’

काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला होता. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की अमरावतीमध्ये जे घडले ते महाराष्ट्रातील इतर कोणत्याही ठिकाणी घडू देऊ नये अन्यथा त्यांना सोडायचे नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मंगळवारी औरंगाबाद येथे कार्यकर्त्यांशी बोलताना ते म्हणाले की, त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात. त्यानंतर अमरावतीमध्ये दंगल उसळते. जनतेच्या मूळ प्रश्नांवरून लक्ष भरकटवण्यासाठीच अशा दंगली घडवल्या जातात. मात्र, अमरावतीत जे घडले, तशी घटना महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात घडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सोडायचे नाही. त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांचा भाषणात बोलतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हे ही वाचा:

मुंबईत काळाबाजारीचे दहा कोटींचे गहू, तांदूळ जप्त

विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर ठाकरे सरकारचा घाला

चक्क सापाला हातात धरून मारल्या दोरीउड्या

केरळमधील शाळेत मुलं- मुली वापरणार सारखाच गणवेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला. शहरात राज ठाकरे येण्यापूर्वी जय श्रीराम चा नारा देणारे बॅनर लावण्यात आले होते. तसेच कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उद्देशून बोलताना राज ठाकरे यांनी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर आणि शहरातील चौकावर मनसेचा झेंडा असला पाहिजे, असेही सांगितले.

Exit mobile version