राज यांचा शरद पवारांना टोमणा आणि मोदींना विनंती

राज यांचा शरद पवारांना टोमणा आणि मोदींना विनंती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेतील भाषणाला सुरुवात करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सणसणीत टोला लगावला. आजची सभा ही सभागृहात घ्यावी लागली कारण पावसाचे वातावरण आहे. शिवाय एस पी कॉलेजकडून मैदान देण्यास नकार देण्यात आला तसेच निवडणुका नाहीत, मग उगाच कशाला भिजत भाषण करा, म्हणून सभागृहात सभा घेऊ, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी शरद पवार यांना लगावला. राज ठाकरे यांनी त्यांच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती देताना पत्रकारांची देखील कानउघाडणी केली.

राज ठाकरे यांनी पवारांना लक्ष्य करताना सांगितले की, शरद पवार म्हणतात की, बाळासाहेब ठाकरे आणि मी सकाळी भांडायचो आणि रात्री एकत्र जेवण करायचो. यातून बाळासाहेबांची प्रतिष्ठा खराब होत आहे. यातून जनतेला वाटेल तेव्हाचे वाद खोटे होते. भोंग्यांचा मुद्दा काढला तर पहिल्यांदा पहाटेचा अजान बंद झाला. माणसं मरतायत, शेतकरी आत्महत्या करतोय, शहरांमध्ये पाणी येत नाहीये पण आम्हाला काही वाटत नाही. आम्ही आपले थंड गोळे. या थंड भूमिकेमुळेच परकीयांनी ९०० वर्ष राज्य केलं आपल्यावर, अशी टीका राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

महाविकास आघाडी सरकारचं म्हणजे कायदे पाळा सांगतोय त्याला नोटीस देणार आणि पाळत नाही त्याच्याशी चर्चा करणार. मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलीस असे शोधत होते जसं काय त्यांनी पाकिस्तान सीमा ओलांडली आहे, असा टोला लगावत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

‘उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी आंदोलनाची केस आहे का?’

लेसबियन एलिमेंट: गरज, अपरिहार्यता की पब्लिसिटी स्ट्रॅटेजी?

… म्हणून इम्रान खान यांनी भारतावर उधळली स्तुतीसुमने

राज ठाकरेंच्या सभेला १३ अटी

कबरींसाठी फंडिंग येतं कुठून?

राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना विनंती केली. ते म्हणाले की, देशात लवकरच समान नागरी कायदा लागू करावा. त्यानंतर लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणावा आणि औरंगाबादचं लवकरच नामांतर करून संभाजी नगर करावे. हिंदू- मुस्लीम वादासाठी यांनी एमआयएमला मोठ केलं यांनी आणि इतकं मोठं केलं की तिथे शिवसेनेचा खासदार पडला आणि त्यांचा निवडून आला. राज्यात कोणीही येतंय; औरंगजेबाच्या थडग्याला फुलं वाहिली जातायत आणि आम्हाला लाज शरम काही वाटत नाही. या कबरींसाठी फंडिंग कुठून येत, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

Exit mobile version