मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये सभा घेतली. आपल्या तुफान फटकेबाजीने राज ठाकरेंनी नुकत्याच घडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजीनामा नाट्यावर प्रतिक्रिया दिली. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत मी म्हणालो होतो काकांकडे लक्ष ठेवा, असा संदर्भ राज ठाकरेंनी दिला.
हल्लीची महाराष्ट्राची राजकीय परिस्थती समजतच नाही. विशेष म्हणजे गेल्या तीन- चार वर्षांपासूनची, असं राज ठाकरे म्हणाले. दोन दिवसांपासून राज्यात राजीनामा नाट्य सुरू होतं. अखेर हे नाट्य काल संपलं.
शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांचे वागणे पाहण्यासारखे होते. माईक खेचण, कार्यकर्त्यांना गप्प बसायला सांगणं असं अजित पवारांचं सुरू होतं. त्यांचं वागण पाहून शरद पवारांच्या मनात आलं असणार, आताच तर मी राजीनामा दिला आहे आणि हा असं वागत आहे. पण, काही दिवसांनी खरंच राजीनामा दिला तर हा मलाही बोलेल गप्प बसा. त्यामुळेच पवार साहेबांना राजीनामा मागे घेतला असेल. खरं तर अजित पवारांना आतून उकळ्या फुटत होत्या, होतंय ते बरं होतंय असं अजित पवारांना वाटत होतं,’ अशी खोचक टीका राज ठाकरेंनी अजित पवारांवर केली.
हे ही वाचा:
बारसूत लोकभावनेबद्दल बोलणाऱ्यांनी महापौरांचा बंगला कसा ढापला?
यूपी संस्कृत बोर्डाच्या परीक्षेत १४,००० मुलांना मागे टाकत मुस्लिम विद्यार्थी अव्वल !