शिवसेनेला आठवण करून द्यायला राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ पोस्ट

शिवसेनेला आठवण करून द्यायला राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ पोस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांविरोधातील आपल्या भूमिकेवर ठाम राहत बुधवार, ४ मे पासून मशिदींमधून भोंग्यांवर अजान ऐकू आल्यास हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केले आहेत. त्यानंतर राज्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून राज्यातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज ठाकरेंसह अनेक मनसे नेत्यांना पोलिसांकडून नोटीसही जारी करण्यात आली आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी आपली भोंग्यांविरोधातील भूमिका स्पष्ट करताना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा एक जुना व्हिडीओ ट्विट केला आहे.

राज ठाकरेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओला कोणतेही कॅप्शन दिलेली नाही. या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे हे भाषणादरम्यान बोलताना दिसत आहेत की, “ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल, त्यावेळेला रस्त्यावरील नामाज पठण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल त्याने येऊन मला सांगाव, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. मशिदीवरील लाऊडस्पीकर्स खाली येतील, बंद.” त्यामुळे हा व्हिडीओ पोस्ट करून राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षाच्या भूमिकेची आठवण करून दिल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा:

राज्यात अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान

राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस

भोंगे हटविण्यासाठी एकत्र या, आता नाही तर कधीच नाही!

बुधवार, ४ मे रोजी श्रीमती शैलजा भातखळकर यांची शोकसभा

सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात येऊन द्यावीत. मशिदीत बांग सुरू झाल्यावर पोलिसांच्या १०० क्रमांकावर भोंग्याचा त्रास होत असल्याची तक्रार करावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी मंगळवार, ३ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Exit mobile version