राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; संपाचा प्रश्न सुटणार?

राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; संपाचा प्रश्न सुटणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. एसटी कामगारांच्या मागण्यांवर या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. काल एसटी कर्मचाऱ्यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे मांडले होते. त्यामुळे राज ठाकरे हे कर्मचाऱ्यांचे म्हणणे शरद पवारांकडे मांडण्याची शक्यता आहे. यावर शरद पवार राज यांना काय आश्वासन देतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

काल एसटी कामगारांनी राज ठाकरे यांच्याकडे कायदेशीर बाबी मांडून त्यांच्या मागण्याही सांगितल्या. यावर सरकारची भूमिका काय आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले. यावर राज ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ‘मी तुमचे नेतृत्व करेन. तुमच्यासाठी सरकारशी चर्चा करेल. मात्र, तुम्ही आत्महत्या करू नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांनी केले होते.

हे ही वाचा:

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केले ‘न्यूज डंका’ च्या दिवाळी अंकाचे कौतुक

एसटीचे विलिनीकरण झाले तर वसुली कशी होईल?

महाराष्ट्रात लवकरच भाजपाचे सरकार

वक्फ बोर्डाशी संबंधितांवर छापेमारी होताच मलिकांचा मंदिर घोटाळ्याचा आरोप

एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करू नये, असेही त्यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केले. त्यामुळे ही भेट महत्त्वाची असून त्यानंतर संपाचा तिढा सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Exit mobile version