आदित्य ठाकरे यांना पत्र; बेस्टच्या ‘चलो ऍप’मध्ये उर्दूचा पर्याय द्या!

आदित्य ठाकरे यांना पत्र; बेस्टच्या ‘चलो ऍप’मध्ये उर्दूचा पर्याय द्या!

समाजवादी पक्षाचे नेते रईस शेख यांची मागणी

बेस्ट बसेससाठी असलेल्या चलो ऍपमध्ये उर्दू भाषेचाही वापर करावा अशी मागणी समाजवादी पार्टीचे नेते रईस शेख यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

भिवंडीतील आमदार असलेले रईस शेख यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश यांनाही यासंदर्भात पत्र लिहिलेले आहे. बेस्टने रईस शेख यांच्या या मागणीची दखल घेऊन पुढील कारवाईचा विचार केला आहे.

रईस शेख यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बेस्टने नुकतेच चलो ऍप सुरू केले आहे. त्यात मराठीव्यतिरिक्त मल्याळम, कन्नड अशा भाषांचा समावेश आहे पण उर्दूचा त्यात समावेश नाही. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बेस्टचे महाव्यवस्थापक यांना ही बाब दाखवून दिली आहे. मला आशा आहे की, माझी मागणी मान्य केली जाईल आणि या ऍपमध्ये उर्दूचा समावेश केला जाईल. मी मुख्यमंत्री आणि बेस्ट व्यवस्थापनाकडे हा विषय नेला आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरेंनी या विषयांवर केली पदाधिकाऱ्यांशी चर्चा

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र निघाले ‘फेक’

ठाकरे सरकार हीच मोठी बनवेगिरी

‘मस्क’ कलंदर, ट्विटर बिलंदर

 

महानगरपालिकेच्या शाळांमधील ८० हजार मुले ही नियमितपणे बेस्टने सफर करतात ही मुले या ऍपचा वापर करतात. उर्दू भाषिक खासगी शाळांमधील विद्यार्थीही त्यात आहेत.

Exit mobile version