छत्रपती संभाजी नगर याच्या नामांतर करण्याच्या विरोधामध्ये आणि नामांतराच्या समर्थनार्थ अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी अक्षरशः लोकांनी एकच गर्दी केली असल्याने आता आयुक्त कार्यालयांत विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आजच्या शेवटचा दिवस असून सुद्धा कार्यालयांत अनेक अर्ज दाखल होत आहेत. तर हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीने सुद्धा आज नामांतराच्या समर्थनार्थ अर्ज दाखल करण्यात येत आहेत. हिंदू एकत्रीकरण समितीच्या कार्यालयातून एकूण दीड लाख कार्यकर्ते नामांतराच्या समर्थनार्थ आयुक्त कार्यालयात दाखल होणार आहेत.
यासंदर्भात हिंदू एकत्रीकरण समितीचे राजेंद्र जंजाळ यांनी माहिती देताना सांगितले कि, एक एक हजार अर्जाचे गठ्ठे तयार करण्यात आले असून ते तीन गाड्यांमधून आयुक्त कार्यालयात जाणार आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात सकळ हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीने हे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. अजून पण नामांतराच्या समर्थनार्थ अर्ज भरून घेण्याचे काम चालू असल्याचे जंजाळ यांनी सांगितले. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत संभाजीनगर नामांतरविरोधात आणि नामातंरच्या समर्थनार्थ हे अर्ज विभागीय कार्यालयात दाखल करता येणार आहेत.
हे ही वाचा:
तीन-चार वर्षात देशात उभारली जातायेत ‘इतकी’ विमानतळे
आगीत साकीनाकाजवळील दुकान भस्मसात, एकाचा मृत्यू
विश्वविजेती निखत झरीन गोपीचंदच्या पावलावर पाऊल टाकणार, उघडणार बॉक्सिंग अकादमी
कॅलिफोर्नियाच्या गुरुद्वारात झाडल्या गोळ्या, २ जण जखमी
भाजपकडून नामांतराच्या समर्थनार्थ औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर करण्यात आले असून अर्ज भरण्यात आले आहेत. भाजपच्या ग्रामीण आणि शहरी अशा सर्व पदाधिकारी यांनी मोहीम राबवून नावाच्या समर्थनार्थ दीड लाख अर्ज भरून घेतले असल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी आज दिली आहे. भाजपचे शिष्टमंडळ आज विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ अर्ज दाखल करण्यासाठी गेले असल्याची माहिती दिली आहे. यावेळेस स्वतः अतुल सावे यांनी आपल्या डोक्यावर हा अर्जाचा गठ्ठा नेऊन विभागीय कार्यालयातील अवाक जावंक विभागामध्ये जमा केला आहे.