अग्निपथ योजनेविरोधातील जाळपोळ, आंदोलनांतून रेल्वेची २५९ कोटींची हानी

अग्निपथ योजनेविरोधातील जाळपोळ, आंदोलनांतून रेल्वेची २५९ कोटींची हानी

अग्निपथ योजना घोषित झाल्यानंतर देशातल्या अनेक भागात त्याचे पडसाद उमटले आणि त्याविरोधात आंदोलने झाली. बिहारमध्ये तर रेल्वेगाड्या जाळण्यात आल्या, अनेक ठिकाणी रेल्वेसेवा खंडित करण्यात आली. त्यातून रेल्वेचे तब्बल २५९ कोटींचे नुकसान झाले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.

संसदेच्या वरिष्ठ सभागृहात वैष्णव यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना जाहीर करण्यात आली. त्यातील अग्निवीरांना लष्करात नोकरी मिळणार असून त्यातून युवा वर्ग मोठ्या प्रमाणात लष्कराची सेवा करू शकेल, अशी ही योजना आहे.

या योजनेअंतर्गत १७.५ ते २१ वर्षांच्या दरम्यानचा युवा वर्ग अग्निपथ योजनेसाठी अर्ज करू शकतो. चार वर्षांसाठी त्याला ही सेवा करता येईल. त्यात तो सक्षम असेल तर पुढील १५ वर्षांसाठी तो सेवेत राहू शकतो. चार वर्षांनंतर ज्यांना या सेवेत राहायचे नसेल त्यांना ११ लाख रुपये मिळणार आहेत.

हे ही वाचा:

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये साडेतीन कोटींच्या हिऱ्यांची लूट!

…म्हणून सलमान खानने घेतली पोलीस आयुक्तांची भेट!

पश्चिम बंगालमध्ये ईडीने केलेल्या छापेमारीत मिळाल्या २० कोटींच्या नोटा

कूकने वेटरवरच चालवला चाकू आणि…

 

या योजनेची घोषणा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्यानंतर देशातल्या काही भागात हिंसक आंदोलने झाली. विशेषतः बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यात रेल्वेगाड्यांना आगी लावण्यात आल्या. ही योजना मागे घ्यावी अशी मागणी करण्याच्या नावाखाली अनेक ठिकाणी तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. सिकंदराबाद येथे रेल्वे गाडी जाळण्यात आली. हरयाणाच्या नरवाणात रेल्वे सेवा खंडित करण्यात आली. रेल्वे ट्रॅकवर उभे राहून रेल्वेसेवेत अडथळे निर्माण करण्यात आले. पलवाल येथे पोलिसांवर जमावाने दगडफेक केली. त्यावर पोलिसांनी गोळीबार केला. आंदोलकांनी अनेक पोलिस वाहने जाळली, त्यांचे नुकसान केले, पोलिसही यात जखमी झाले.

Exit mobile version