ग्रेट!! पाच वर्षांत रेल्वेच्या प्रतीक्षा यादीचा त्रास संपणार

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

ग्रेट!! पाच वर्षांत रेल्वेच्या प्रतीक्षा यादीचा त्रास संपणार

भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे पुढील चार-पाच वर्षांत तीन हजार नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्याच्या तयारीत आहे. प्रवासात लागणारा वेळ कमी करण्यासाठीही रेल्वे मंत्रालयातर्फे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. नव्या रेल्वेगाड्या सुरू झाल्यावर सन २०२७पर्यंत प्रतीक्षा यादीचा ताप संपुष्टात येईल आणि सर्वांना कन्फर्म्ड तिकीट मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

 

येत्या पाच वर्षांत प्रवाशांच्या मागणीनुसार, रेल्वेगाड्यांची संख्या वाढवली जाईल. दरवर्षी ८०० कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. पाच वर्षांत ही क्षमता एक हजार कोटी करण्याचे रेल्वेचे लक्ष्य आहे. रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार, ६९हजार नवे डबे तयार आहेत. दरवर्षी सुमारे पाच हजार नवे डबे तयार केले जात आहेत. त्यानंतर दरवर्षी रेल्वेकडून ४०० ते ४५० वंदे भारत रेल्वेव्यतिरिक्त २०० ते २५० नव्या रेल्वेगाड्या चालवल्या जाऊ शकतात. प्रवासाचा वेळ कमी करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्य म्हणजेच वातानुकूलित नसलेल्या रेल्वेडब्यांची संख्या यंदा कमी असल्याचे वृत्त रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी फेटाळून लावले.

 

हे ही वाचा:

वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहायला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार

ऑस्ट्रेलियात शीख व्यक्तीच्या गाडीवर ओरखडे, आक्षेपार्ह चित्र

मुंबईतील हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांची वाहनांवर कारवाई

शरद पवारांनी आता ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा द्यावी!

 

वैष्णव यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत या सणांच्या मोसमात विशेष रेल्वेगाड्यांच्या संख्येत सुमारे तीनपट वाढ झाली आहे. या सणाच्या काळात प्रवाशांच्या गर्दीला सामावून घेण्यासाठी १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सहा हजार ७५४ अतिरिक्त रेल्वे चालवल्या जात आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत हीच संख्या दोन हजार ६१४ होती. दिवाळी आणि छठ पूजेसाठी विशिष्ट नियोजन आखल्याची माहिती त्यांनी दिली.

Exit mobile version