रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर…

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर…

७८ दिवसांचा बोनस मंत्रिमंडळाकडून मंजूर

केंद्रीय मंत्रिमंडळ ६ ऑक्टोबर रोजी भारतीय रेल्वेने नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी बोनस जाहीर केला आहे. हा बोनस ७८ दिवसांच्या वेतनाच्या बरोबरीचा असेल.

रेल्वे मंत्रालयाने सर्व नॉन-गॅझेटेड रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी ७८ दिवसांच्या वेतनाच्या बरोबरीचे बोनस देण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर केला आहे. मंत्रिमंडळाने आज हा प्रस्ताव मंजूर केला आहे.

२०१९-२० मध्ये, भारतीय रेल्वेने आपल्या जवळपास ११ लाख ५८ हजार नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस दिला होता, एकूण २ हजार ८१ कोटी ६८ लाख रुपये इतका हा बोनस होता.

गेल्या वर्षी भारतीय रेल्वेने बोनस भरण्यासाठी वेतन गणना मर्यादा ७ हजार रुपये प्रति महिना निश्चित केली होती. प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त देय रक्कम ७८ दिवसांसाठी १७ हजार ९५१ रुपये ठेवण्यात आली होती.

हे ही वाचा:

तुम्ही माझ्या वडिलांना कधीही मारू शकत नाही

२०२५ मध्ये चीन तैवानवर कब्जा करणार?

अमेरिकेकडे किती अण्वस्त्र?

एलआयसी आयपीओमध्ये २०% एफडीआयला संमती?

रेल्वेमधील बोनस संपूर्ण देशभर पसरलेले सर्व नॉन-गॅझेटेड रेल्वे कर्मचारी (RPF/RPSF कर्मचारी वगळता) कव्हर करतात. पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना पीएलबीचे पेमेंट दरवर्षी दसरा/पूजेच्या सुट्ट्यांपूर्वी केले जाते. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Exit mobile version