काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या अवमानकारक विधानाबाबत जाहीरपणे माफी मागत नाहीत. तोपर्यंत त्यांना मुंबईत पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा खासदार राहुल शेवाळे यांनी दिला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ शिंदे गटाने राहुल गांधी यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्यासह शालेय मंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, विभागप्रमुख गिरीश धानुरकर, महिला विभाग संघटिका प्रिया गुरव यांसह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
राहुल शेवाळे आणि रणजित सावरकर यांच्या उपस्थितीत, राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारून त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला. यावेळी ‘सावरकरजी के सन्मान में, शिवसेना मैदान में’ अशा घोषणाही पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी दिल्या. त्यावेळी राहुल शेवाळे म्हणाले, राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाबाबात जोपर्यंत माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना मुंबईमध्ये पाऊल ठेऊ देणार नाही. काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनीही काही वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला होता, तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विरोधात जोडे मारा आंदोलन केले होते. त्यांच पद्धतीने आज आम्ही देखील हे जोडे मारो आंदोलन करून राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध करत आहोत, असं राहुल शेवाळे म्हणाले.
हे ही वाचा :
सजा की मजा! तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांनी घेतला मसाजचा आनंद
स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न
श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह
धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले
तसेच अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी का केली नाही? संजय राऊत यांनी संसदेत ही मागणी का लावून धरली नाही? त्यांना खरंच सावरकरांविषयी आदर असेल, तर त्यांनी त्वरित महविकास आघाडीतून बाहेर पडायला हवे, असंही राहुल शेवाळे म्हणाले आहेत.