जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव भारतात पार पडला असून त्याचा निकाल आज जाहीर होत आहे. मंगळवार, ४ जून रोजी देशभरात मतमोजणीला सुरुवात झली असून हळहळू मतदारांचा कल समोर येत आहे. सुरुवातीच्या कलानुसार देश पातळीचा विचार केल्यास एनडीए आघाडीवर असून इंडी आघाडी पिछाडीवर आहे.
महाराष्ट्रातीलं मुंबईच्या सहा जागांचा विचार करता येथे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात बरोबरीचा सामना रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील सहा जागांवर सध्या अरविंद सावंत- द. मुंबई (आघाडीवर), अमोल किर्तीकर- वायव्य मुंबई (आघाडीवर) पियूष गोयल- उत्तर मुंबई (आघाडीवर), राहुल शेवाळे- द.मध्य मुंबई (आघाडीवर), वर्षा गायकवाड- उत्तर मध्य मुंबई (आघाडीवर), संजय दिना पाटील – ईशान्य मुंबई (आघाडीवर) असे चित्र आहे. अद्याप मतमोजणी पूर्ण झालेली नसून ही सुरुवातीची आकडेवारी आहे.
हे ही वाचा:
क्रिकेट खेळताना तरुण मैदानावरच कोसळला!
कोल्हापुरात भरधाव कारने सहा जणांना उडवले! तिघे मृत
शैक्षणिक नैराश्यातून मुंबईतील ‘आयएएस’ दाम्पत्याच्या मुलीने केली आत्महत्या