राहुल शेवाळे शिवसेनेचे गटनेते, तर भावना गवळी मुख्य प्रतोद

राहुल शेवाळे शिवसेनेचे गटनेते, तर भावना गवळी मुख्य प्रतोद

महाराष्ट्रानंतर आता केंद्रातही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ५० आमदारांसह शिवसेनेचे १२ खासदार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत. या धक्क्यानंतर आता शिवसेनेला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक मोठा दणका दिला आहे. या बंडखोर खासदारांनी गटनेता बदलण्याची केलेली मागणी मान्य करत राहुल शेवाळे यांना गटनेता म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी काल दिल्लीत बंडखोर खासदारांसोबत बैठक घेतली. यानंतर त्यांनी शिवसेनेचा स्वतंत्र गट म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं होतं. पत्र सादर करण्यात आल्यानंतर काही तासांमध्ये यासंदर्भात निर्णय घेत शिंदे समर्थक शिवसेना खासदारांची मागणी लोकसभा अध्यक्षांकडून मान्य करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकाच्या मुसक्या आवळल्या

लोकसभा अध्यक्ष संतापले; ही सदस्यांची दुटप्पी वृत्ती

उदयपूरनंतर आता बिहारमध्ये नुपूरप्रकरणी एका तरुणाला भोसकले

…पण उद्धव म्हणाले, राष्ट्रवादीची साथ सोडणार नाही!

ओम बिर्ला यांनी शिवसेनेचा सभागृह नेता बदलण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून आता राहुल शेवाळे हे शिवसेनेचे गटनेते असतील. तर भावना गवळी या मुख्य प्रतोद असतील. या नव्या निर्णयामुळे पुन्हा एकदा न्यायालयामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version