28 C
Mumbai
Thursday, December 12, 2024
घरराजकारणराहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड!

राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड!

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल नार्वेकरांच्या निवडीसाठी मांडला प्रस्ताव

Google News Follow

Related

भाजपा नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून ते पुन्हा एकदा अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत. सोमवार, ९ डिसेंबर रोजी विधानसभा विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली.

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड करावी, यासाठी प्रस्ताव मांडला. याला अनिल पाटील यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने एकमताने विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. पुढे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांच्या एकमताने निवडीची घोषणा केली. राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहे. राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

रविवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी नार्वेकर यांचा एकमेव अर्ज आला होता. विरोधी पक्षाने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सोमवारी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा झाली. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा सचिवालयात रविवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

यापूर्वीच्या शिंदे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात राहुल नार्वेकर यांच्याकडेच विधानसभेचे अध्यक्षपद राहिले होते. सर्वोच्च न्यायालयाने मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादीवरील दावेदारीचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे दिली होती. त्यानंतर नार्वेकरांनी दोन्ही खटल्यात प्रत्यक्ष सुनावणी घेत निकाल सुनावला होता. तेव्हा ते चांगलेच चर्चेत आले होते.

हे ही वाचा : 

सीरियाचे राष्ट्राध्यक्ष असद यांच्या राजवाड्यावर बंडखोरांचा ताबा

चिन्मय कृष्णा दास यांच्यासह शेकडो समर्थकांवर गुन्हा दाखल

मेघालयचे डॉ. विद्यानिष्ठ मारक यांना आज ‘अवर नॉर्थ ईस्ट इंडिया ऍवॉर्ड २०२४’ होणार प्रदान

दिल्लीतील ४० हून अधिक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; ३० हजार डॉलर्सची मागणी

राहुल नार्वेकर हे वकील असून त्यांनी शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. राहुल नार्वेकरांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. पुढे २०२४ मध्येही त्यांनी विजय मिळवला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
212,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा