महाराष्ट्रात शिवसेनेचा शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं. त्यांनतर आता नव्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची नियुक्ती होणार आहे. विधानसभेचे अध्यक्षपद भाजपाकडे आहे. त्यासाठी भाजपाने आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. शुक्रवार,१ जुलै रोजी राहुल नार्वेकरांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.
BJP leader Rahul Narwekar files his nomination for the post of Speaker of Maharashtra Legislative Assembly pic.twitter.com/7Wf67HXtHv
— ANI (@ANI) July 1, 2022
शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वी एकनाथ शिंदे सरकारची विधानसभेत परीक्षा होईल. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार, महाराष्ट्र विधीमंडळाचं विशेष अधिवेशन ३ आणि ४ जुलै पार पडणार आहे. २ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर ३ जुलै रोजी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. त्यानंतर ४ जुलै रोजी बहुमत चाचणी पार पडेल. दरम्यान, राहुल नार्वेकर हे ४५ वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यास ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील.
हे ही वाचा:
शिंदे सरकारचा मोठा निर्णय; मेट्रो कारशेड आरेतच!
शिवसेनेला बाजुला ठेवून मुख्यमंत्री होऊच शकत नाही!
“सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला ठाकरेंना पाहवत नाही”
उस्मानाबादच्या नामकरणावरून राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राज्यात शिंदे सरकार आले आणि त्यांनी राज्यातील रखडलेली कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर त्यांनी मुंबईतील बहुचर्चित मेट्रो-३ चे कारशेड पुन्हा आरेतच बांधण्याचा निर्णय घेतला आहे.