संसदभवन उद्घाटनावर बहिष्कार हे विरोधकांच्या वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली टीका

संसदभवन उद्घाटनावर बहिष्कार हे विरोधकांच्या वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक

लोकशाहीचे पवित्र मंदिर म्हणून गौरविण्यात येणाऱ्या भारतीय संसदेच्या नूतनवास्तूचे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीदिनी म्हणजेच २८ मे, २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते उदघाटन होत आहे, ही अत्यंत अभिमानाची घटना आहे. मात्र या ऐतिहासिक समारंभावर बहिष्कार घालण्याची काही विरोधी पक्षांची कृती ही अत्यंत गैर आणि त्यांच्यातील वैफल्यग्रस्ततेची निदर्शक आहे, असे मत महाराष्ट्र विधानसभचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे.

संसदीय कार्य प्रणालीत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष अशा दोहोंचा सहभाग महत्वाचा मानला जातो. संसदेच्या माध्यमातून लोकहिताच्या प्रश्नांना न्याय दिला जातो, राष्ट्रीय प्रश्न सोडविले जातात, धोरण निश्चिती होते. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे संसदेच्या नूतनवास्तूचे उदघाटन होत असताना विरोधी पक्षांनी त्यावेळी बहिष्कार घालणे उचित होणार नाही. भारत हा जगातील सर्वात मोठा संसदीय लोकशाही असलेला देश म्हणून ओळखला जातो. त्या देशाच्या संसदेच्या नूतनवास्तूचे देशाच्या माननीय पंतप्रधानांच्या शुभहस्ते उदघाटन होत असताना अशाप्रकारे गालबोट लावले जाणे सर्वथा अनुचित आहे.

हे ही वाचा:

वीजचोरी पकडणाऱ्या महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला

बिजू जनता दलाचे ठरले! संसद भवन कार्यक्रमाला उपस्थित राहणार

मोदी म्हणाले, परदेश दौऱ्यात तिथले विरोधकही आपल्या देशासाठी कार्यक्रमांना उपस्थित होते!

जितेंद्र आव्हाड हेच करमुसे अपहरण प्रकरणाचे सूत्रधार…

भारतातील एका राज्याच्या विधानसभेच्या नूतनवास्तूचे उदघाटन कोणत्याही संविधानिक पदाची जबाबदारी त्यावेळी ज्यांच्याकडे नव्हती अशा व्यक्तीच्या हस्ते करण्यात आलेले आहे. मात्र सर्वच पक्षीय प्रतिनिधी, नेते त्यावेळी उपस्थित होते. “देशाचे पंतप्रधान” या संविधानिक पदावरील महनीय नेत्याच्या शुभहस्ते हा ऐतिहासिक समारंभ आता होत असताना काहींच्या पोटात का दुखत आहे, असा सवालही ॲड. नार्वेकर यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version