राहुलची राहुलला ‘प्रेम’ळ चपराक

राहुलची राहुलला ‘प्रेम’ळ चपराक

ट्विटरवर रंगणारी राजकीय युद्ध ही आता नित्याचीच बाब झाली आहे. अनेकदा या राजकीय हाणामाऱ्यांमध्ये राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते असतातच. पण अनेकदा राजकारणाशी थेट संबंध नसलेले सामान्य नागरिकही राजकीय नेत्यांना टोला लागवताना दिसतात. शनिवार ३१ जुलै रोजी असाच एक कलगीतुरा ट्विटरवर पाहायला मिळाला. ज्यामध्ये धारशाही झाले काँग्रेसचे नेते राहुल गांधी.

काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी हे ट्विटरवर सक्रिय असतात. ट्विटरच्या माध्यमातून ते दिवस रात्र मोदी सरकारवर टीका करत असतात. शनिवार, ३१ जुलै रोजी देखील अशाच प्रकारे राहुल गांधी यांनी एक ट्विट केले. प्रसिद्ध हिंदी लेखक मुंशी प्रेमचंद यांच्या ओळी लिहिल्या. “आदमी का सबसे बड़ा दुश्मन उसका ग़ुरूर है।” असे राहुल गांधींनी म्हटले आहे. म्हणजेच माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचा अहंकार आहे.

हे ही वाचा:

मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही

पीव्ही सिंधू पराभूत होऊनही पदकाची आशा?

‘या’ राजकीय नेत्याचा राजकारणातून सन्यास

एवढ्या पूरग्रस्त परिस्थितीत राऊत कधी पाण्यात उतरले का?

राहुल गांधी यांचे हे ट्विट नक्की कोणाला उद्देशून आहे. हे जरी स्पष्ट झाले नसले तरी त्यांचे हे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच उद्देशून असल्याचे म्हटले जात आहे. पण राहुल गांधींच्या या ट्विटला दुसऱ्या एका राहुलने सणसणीत उत्तर दिले आहे. हे राहुल म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वर्गीय नेते प्रमोद महाजन यांचे चिरंजिव राहुल महाजन हे आहेत. राहुल महाजन यांनी देखील मुंशी प्रेमचंद यांच्याच ओळी शेअर करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘बुद्धीहीन माणसासाठी विद्या बेकार आहे’ असे म्हणत राहुल महाजन यांनी सणसणीत चपराक लगावली आहे.

Exit mobile version