काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारतजोडो न्याय यात्रे’ला पश्चिम बंगालमध्ये परवानगी मिळत नसल्याचा आरोप पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी शुक्रवारी केला. २८ जानेवारी रोजी कूचबिहारमधील फालाकाटामधून पुन्हा सुरू होणाऱ्या यात्रेचा कार्यक्रम राज्य सरकारला खूप आधीच सोपवण्यात आला होता. तेव्हा राज्य सरकारने काही सांगितले नाही. आता मात्र ते परवानगी देऊ शकणार नाहीत, असे सांगत आहेत.
आम्हाला मणिपूर आणि आसाममध्ये अडचणींचा सामना करावा लागला. आणि आता पश्चिम बंगालमध्येही अडचणींचा सामना करावा लागत आहे,’ असा आरोप चौधरी यांनी केला आहे.
‘आम्हाला सिलिगुडीमध्ये एक सार्वजनिक सभा घेण्याची परवानगी मिळाली नाही. आम्हाला राज्य सरकारकडून सहकार्याची अपेक्षा होती. तरीही काही बदल वगळता यात्रेचा मार्ग आणि यात्रेचा कार्यक्रम तोच राहील,’ असे त्यांनी स्पष्ट केले. १४ जानेवारीला मणिपूरमधून सुरू झालेल्या यात्रेने गुरुवारी आसाममधून पश्चिम बंगालमधील कूचबिहारमध्ये प्रवेश केला. दोन दिवसांच्या विश्रामानंतर ही यात्रा २८ आणि २९ जानेवारी रोजी उत्तर बंगालकडून निघेल आणि २९ जानेवारी रोजी बिहारमध्ये प्रवेश करेल.
तृणमूल काँग्रेसने नुकतेच लोकसभा निवडणुका एकट्याने लढवण्याचा निर्धार केला आहे. तसेच, काँग्रेसच्या यात्रेबाबत आपल्याला माहिती न दिल्याने तृणमूल काँग्रेस त्यात सहभागी होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
सरकारकडून जीआर मिळताच जरांगेंकडून आंदोलन मागे
जरांगे म्हणतात आमचा विरोध संपला; आरक्षणाबाबत सरकारकडे अध्यादेश तयार
मोइज्जू यांना झाली जुन्या मैत्रीची आठवण, प्रजासत्ताक दिनाच्या भारताला दिल्या शुभेच्छा!
प्रजासत्ताक दिनी महिला शक्तीचे दिसले सामर्थ्य
‘काँग्रेसचा अवमान करण्यासाठी अनुमती दिली नाही’
काँग्रेसला अवमानित करण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगाल सरकारने यात्रेला परवानगी दिली नाही, असा आरोप भाजपचे प. बंगालचे प्रदेशाध्यक्ष अमित मालवीय यांनी केला आहे.