काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचे ट्विटर खाते लॉक करण्यात आले आहे. ट्विटरकडून राहुल गांधी यांच्या खात्यावर कारवाई करत ते अस्थायी स्वरूपात लॉक करण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षाकडून सुरुवातीला या बाबत असे सांगण्यात आले की राहुल गांधी यांचे खाते ट्विटर कडून सस्पेंड करण्यात आले आहे. राहुल गांधी यांचे ट्विट डिलीट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे हे खाते अस्थायी स्वरूपात सस्पेंड करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत होते. पण त्यावर ट्विटरने खुलासा केला आहे की राहुल गांधी यांच्या अकाउंट सस्पेंडेड केले नसून ते फक्त अस्थायी स्वरूपात लाॅक करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
जेष्ठ संघ प्रचारकांचा सन्मान…टपाल खात्याने प्रकाशित केले टपाल तिकीट
भाजपा-मनसे युतीबद्दल देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान
दिल्ली येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेबद्दल ट्विटरवर व्यक्त होताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीडितेची ओळख खुली होईल अशाप्रकारे ट्विट केले होते. त्याच्यावर जनतेने आक्षेप घेतला असून त्यांच्या असंवेदनशीलतेवर टीका केली होती. त्याचवेळी त्यांच्या ट्विटवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. त्यानुसारच ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटने राहुल गांधींचे ट्विट हटवले होते. तर आता राहुल गांधी यांचे खाते अस्थायी स्वरूपात लॉक करण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबद्दल माहिती देण्यात आली असून त्यांचे खाते पुन्हा सुरू व्हावे यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. तर ट्विटर खाते सुरू होईपर्यंत राहुल गांधी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जनतेशी जोडलेले राहतील आणि आवाज उठवत राहतील असे काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात येत आहे.