‘सिद्धू यांच्या रक्तात पंजाब, हवे तर कापून बघा’

‘सिद्धू यांच्या रक्तात पंजाब, हवे तर कापून बघा’

राहुल गांधी यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर खिल्ली

राहुल गांधी आपल्या विचित्र वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या पंजाबच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभा रंगत आहेत. अशाच एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंजाबमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. राहुल यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडविण्यात येत आहे.

राहुल गांधी म्हणाले की, सिद्धू यांच्या रक्तात, हृदयात पंजाब आहे. कापून बघा हवे तर रक्त निघाले की, त्यात पंजाब दिसेल.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनीही टाळ्या वाजविल्या. पण मंचावर बसलेल्या सिद्धू यांची मुद्रा मात्र बघण्यासारखी झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून आपण राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर आनंद व्यक्त करावा की चिंता असे अवघडलेले भाव दिसत होते.

हे ही वाचा:

…आणि चीनने पाकिस्तानला एक दमडीही दिली नाही

राज्यसभेत लता दीदींना वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्लोबल लीडर यादीत पुन्हा नंबर वन…

फिरकीसमोर वेस्ट इंडीजने गुडघे टेकले; हजाराव्या सामन्यात भारताचा दमदार विजय

 

सध्या पंजाबमधील निवडणुकात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून घमासान सुरू आहे. त्यात आता चरणजीत सिंग चन्नी यांनाच काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे. नवज्योत सिद्धू मुख्यमंत्री बनण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे सिद्धू आणि चन्नी यांच्यातही दरी उत्पन्न झाली आहे. मात्र काँग्रेसने सिद्धू यांची समजूत काढण्यात यश मिळविले आहे.

पण आता राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे सिद्धू यांची चांगलीच गोची झाली आहे.

राहुल गांधी याआधीही अशाच अनेक वक्तव्यांवरून गमतीचा विषय बनले आहेत. एका बाजुने बटाटे टाकल्यावर दुसऱ्या बाजूने सोने निघेल हे त्यांचे वक्तव्य चांगलेच गाजले होते. त्यावरून आजही त्यांना लक्ष्य करण्यात येते. राफेल घोटाळ्याचा आरोप करताना राहुल गांधी यांनी आपल्या वेगवेगळ्या भाषणात घोटाळ्याचे नवनवे आकडे सांगितल्यामुळेही ते थट्टेचा विषय बनले आहेत.

 

Exit mobile version