‘कुणी प्रश्न विचारायचे त्या पत्रकारांची यादी, राहुल गांधींच्या परिषदेत तयार होती’

राहुल गांधी यांच्यावर चोहोबाजूंनी टीका

‘कुणी प्रश्न विचारायचे त्या पत्रकारांची यादी, राहुल गांधींच्या परिषदेत तयार होती’

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार तोफा आज थंडावणार असून सर्वचं पक्षांकडून आज विरोधकांवर अखेरचा राजकीय प्रहार करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मुंबईत पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी ‘एक है तो सेफ है’ असं लिहिलेली एक तिजोरी पत्रकार परिषदेत आणून भाजपावर टीका केली. याशिवाय त्यांनी महाराष्ट्रातील अनेक विषयांवर संवाद साधला. मात्र, यानंतर आता राहुल गांधी यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत असून त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही सुनियोजित आणि प्रश्न कोण विचारणार याची फिल्डिंग लावलेली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत तिजोरी आणून भाजपाला लक्ष्य करण्यासाठी हटके स्टाईल वापरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्रकार परिषदेमध्ये बोलून झाल्यानंतर पत्रकारांनी राहुल गांधी यांना कोणतेही अडचणीत टाकणारे आणि कोड्यात टाकणारे प्रश्न विचारू नयेत म्हणून काँग्रेसच्या टीमकडून आधीच खबरदारी घेण्यात आली होती. कोणते पत्रकार कोणता प्रश्न विचारणार हे आधीच काँग्रेसकडून ठरवण्यात आले होते. काँग्रेसच्या टीम कडून ज्याचे नाव पुकारले जाईल त्यालाच प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आल्याचे स्पष्ट दिसून आले. ठराविक प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर आपल्याला झारखंडला जायचे असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद अक्षरशः आटोपती घेतली हे ही दिसून आले. यावरून मात्र आता राहुल गांधी आणि काँग्रेसवर सर्वच बाजूंनी टीका होत आहे.

हे ही वाचा : 

उद्धव ठाकरेंसारख्या खाष्ट सासूमुळेचं सगळे शिवसेनेतून बाहेर पडले

औरंग्या फॅन क्लबकडे लोकांची पाठ, उबाठांना मिळतेय रिकाम्या खुर्च्यांची साथ!

दिल्या घरी सुखी रहा, स्वतःच्या जुन्या कॅसेट स्वतः ऐकत बसा!

मणिपूर हिंसाचारात एक आंदोलक ठार, जमावाकडून भाजप-काँग्रेस कार्यालयांची तोडफोड!

पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या इतर पत्रकारांनीही काँग्रेसच्या या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘एबीपी न्यूज’च्या राजकीय संपादिका मेघा प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेमधील फिल्डिंगवर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, “राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेमध्ये अशा प्रकारे प्रश्न विचारले गेले. पवन खेरा यांच्या फोनवर एक यादी होती ज्यानुसार त्यांनी नावे पुकारली. कोणाकोणाला प्रश्न विचारण्याची परवानगी दिली जाईल हे पूर्णपणे आधीच ठरलेले होते. पत्रकार परिषदेमध्ये बसलेल्या इतर पत्रकारांकडे आणि त्यांच्या हात वर करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले.”

Exit mobile version