राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा लोकसभेत तमाशा

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा लोकसभेत तमाशा

काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने लोकसभेत तमाशा केला. काँग्रेस खासदार राहुल गांधी हे लोकसभेत भाषणाला उभे राहिले पण ते विषय सोडून भाषण करत राहिले आणि नंतर आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसोबत लोकसभेत नवा तमाशा केला.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यावर संसदेत चर्चा सुरु आहे. याच चर्चेत सहभाग घेण्यासाठी राहुल गांधी उभे राहिले पण अर्थसंकल्पावर बोलायचे सोडून ते शेतकरी कायद्यांवर बोलू लागले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना वारंवार अर्थसंकल्पावर बोलण्याचाही विनंती केली. तेव्हा “मी अर्थसंकल्पावर बोलणार आहे” असे म्हणत त्यांनी आपले भाषण सुरु ठेवले. पण पूर्णवेळ ते फक्त आणि फक्त शेतकरी कायद्यांवरच बोलत राहिले. अखेर आपल्या भाषणाच्या शेवटी “मी अर्थसंकल्पावर बोलणार नाही” असे म्हणत त्यांनी एक वेगळीच नौटंकी सुरु केली.

भाषण संपवताना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आंदोलनात मृत झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मौन पाळत उभे राहण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देतात सर्व काँग्रेस खासदार मौनात उभे राहिले. पण काँग्रेस पक्षाचा हा तमाशा सभागृहाच्या शिस्तीला धरून अजिबात नव्हता.

हे ही वाचा:

राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची असा तमाशा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी कधी पंतप्रधान मोदींना मिठी मार तर कधी सहकाऱ्याला डोळा मार असे अनेक तमाशे केले आहेत.

हे ही वाचा:

राज्यपालांचा ठाकरे सरकारकडून पुन्हा अपमान

Exit mobile version