काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक पडला बंद!

माईक सुरू होताच भाजपावर टीका

काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक पडला बंद!

भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेस पक्षाने दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये एका कार्यकर्माचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात राहुल गांधींनी भाषण केले. कार्यक्रमाला संबोधित करताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी दलित आणि जात जनगणनेबाबत बोलत होते. यावेळी राहुल गांधी भाषण करत असतानाच अचानक माईक बंद झाला आणि तो बराच वेळ सुरु झाला नाही. लाईट गेल्यामुळे माईक बंद झाला होता. काही वेळानंतर लाईट आल्यावर राहुल गांधींनी आपले भाषण सुरू करत भाजपावर टीका केली. राहुल गांधी यांनी संसदेत बोलत असताना अनेकवेळा माईक बंद केल्याचा आरोप केला होता. यानंतर आता राहुल गांधी आपल्याच पक्षाच्या कार्यक्रमात माईक बंद झाल्याने हसताना दिसले.

माईक सुरू झाल्यावर राहुल गांधी म्हणाले की, “तुम्ही कितीही प्रयत्न केले, माईक बंद केला तरी मला गप्प करू शकणार नाहीत. मला जे बोलायचे आहे, ते मी बोलेन. नरेंद्र मोदी यांनी संविधान वाचले असते, तर असे वागले नसते,” अशी टीका राहुल गांधींनी केली.

यापूर्वीही अनेकदा संसदेच्या सत्रावेळी त्यांचा अथवा विरोधकांचा माईक बंद केला जात असल्याची तक्रार वारंवार राहुल गांधी किंवा विरोधकांकडून केली जाते. यावर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना सुनावले देखील होते. स्पीकरच्या नावाची घोषणा होताच खासदाराचा माईक ऑन केला जातो. ज्याला बोलण्याची विनंती केली जात नाही त्याचा माईक चालू केला जात नाही. माईकचा रिमोट कंट्रोल कधीच स्पीकरच्या हातात नसतो, असे त्यांनी स्पष्ट केले होते. यानंतरही राहुल गांधी यांनी वारंवार त्यांचाचं माईक बंद केला जातो असा आरोप केला होता. दरम्यान, परदेशात जाऊनही राहुल गांधी यांनी माईक बंद असण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. ब्रिटनच्या दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी संसदेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, कधी कधी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे मायक्रोफोन बंद केले जातात.

हे ही वाचा : 

संसदेतील कार्यक्रमात काँग्रेसच्या राजकुमारांचा अहंकार दिसला

आम्ही कायद्याची छाननी करण्यासाठी, विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही!

राज्यघटना लोकशाहीचा पाया असून संविधान देशासाठी सर्वात पवित्र ग्रंथ

चंदीगडमधील दोन क्लबबाहेर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी फेकली स्फोटके

Exit mobile version