नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौथ्या दिवशीही चौकशी सुरु आहे. सोमवार, २० जून रोजी म्हणजेच आज ११ वाजल्यापासून राहुल गांधी यांची चौकशी सुरु आहे. याआधी राहुल गांधी यांची तीन वेळा चौकशी झाली आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांची चौकशी चौथ्या दिवशीही सुरू आहे. आतापर्यंत राहुल गांधीची जवळपास तीस तास चौकशी झाली आहे. यासंदर्भातच काँग्रेसने सोमवार, २० जून रोजी खासदारांची बैठक बोलावली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची चौकशी सुरु असल्यापासून काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन करत आहेत. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतेले आहे. त्यांनतर प्रियांका गांधींनी या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांच्या ताब्यातून वाचवले आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशिवाल्या मावळ्याचा!
‘अग्निवीराला शिस्त, कौशल्ये रोजगारक्षम बनवेल’
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यात पावसाची खेळी; मालिका बरोबरीत सुटली
विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज रणधुमाळी!
दरम्यान, ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेसचे एक शिष्टमंडळ आज संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ आणि अग्निपथ योजनेविरुद्ध आंदोलन करत आहेत. यापूर्वी ईडीने राहुल गांधींची तीन दिवसांत तीस तास चौकशी केली आहे. राहुल गांधींनी चौकशीत दिलेल्या उत्तरावर ईडी असमाधानी आहे. त्यामुळेच त्यांच्यासोबत झालेल्या चौकशीचे रेकॉर्डिंग आणि प्रत्येक कागदपत्रे अतिशय काळजीपूर्वक हाताळली जात आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधींशिवाय सोनिया गांधी, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा हेही आरोपी आहेत. तर ऑस्कर फर्नांडिस आणि मोतीलाल व्होरा या दोन आरोपींचा मृत्यू झाला आहे.