राहुल गांधी यांची वायनाडमधून उमेदवारी जवळपास निश्चित

राहुल गांधी यांची वायनाडमधून उमेदवारी जवळपास निश्चित

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. सूत्रांनी सांगितल्यानुसार, राहुल गांधी हे वायनाडमधून लढतील. तर, छत्तीसगढमध्ये भूपेश बघेल यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आता ११ मार्चला होईल.

सूत्रांनी सांगितल्यानुसार, केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी आणि त्रिवेंद्रम येथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. तसेच, कर्नाटकमधून निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या नावाचीही चर्चा झाली. मात्र या बैठकीत कर्नाटकमधील गुलबर्ग जागेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.

छत्तीसगढमधून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल निवडणूक लढू शकतात. ते येथील राजनांदगाव लोकसभा मतदारसंघातून उभे राहण्याची शक्यता आहे. तर, दुर्गमधून ताम्रध्वज साहू, कोरबा जागेवरून ज्योत्सना महंत तर, शिव डहरिया यांना जांजगीर-चांपा लोकसभा जागेवरून मैदानात उतरवले जाऊ शकते.

हे ही वाचा :

जागतिक महिला दिनी पंतप्रधान मोदींकडून मोठी भेट; सिलेंडरच्या किंमतीत १०० रुपयांची कपात

मोहम्मद शमी उतरणार निवडणुकीच्या मैदानात?

रोहतकची जागा अभिनेता रणदीप हुड्डाला?

बेंगळुरूत पाण्याची भीषण टंचाई

दिल्लीतील जागांवरही चर्चा

या बैठकीत समितीने दिल्लीच्या तीन जागांवर अनेक उमेदवारांच्या नावांची चर्चा केली. चर्चेनंतर समितीने एक नाव ठरवले आहे. मात्र त्यावर अद्याप शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. दिल्लीच्या चांदनी चौक जागेवर जेपी अग्रवाल, संदीप दीक्षित आणि अलका लांबा यांच्या नावावर चर्चा झाली. दिल्लीच्या उत्तर पूर्व लोकसभा जागेवरून अरविंदर सिंह लवली आणि अनिल चौधरी यांच्या नावांवर चर्चा झाली. दिल्लीच्या उत्तर पश्चिम लोकसभा जागेवर राजकुमार चौहान आणि उदित राज यांच्या नावांवर चर्चा झाली.

Exit mobile version