काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ निर्धारित वेळेच्या १० दिवस आधीच म्हणजेच १० मार्च रोजीच संपण्याची चिन्हे आहेत. आघाडीच्या घटकपक्षांना लागलेली गळती आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यात्रा निश्चित केलेल्या वेळेआधीच संपवण्याची तयारी सुरू झाली आहे.
दररोज ७० किमीचे अंतर पार करण्याचे या यात्रेचे लक्ष्य होते. मात्र आता दररोज १०० किमीचे अंतर कापले जात आहे. त्यामुळे ही यात्रा तिचे लक्ष्य लवकरात लवकर पूर्ण करते आहे. परिणामी, उत्तर प्रदेशात काँग्रेसची यात्रा आता ११ दिवसांऐवजी सहा ते सात दिवसांतच आपला प्रवास पूर्ण करेल.
हे ही वाचा:
प्रियंका गांधी यांच्या टीममधील माजी सदस्य आचार्य प्रमोद कृष्णन निलंबित!
पर्यटनात महाराष्ट्र बनला आता आंतराष्ट्रीय आकर्षणाचा केंद्रबिंदू
काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले प्रमोद कृष्णम म्हणाले, राम आणि राष्ट्र याबाबत तडजोड नाही!
भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूंबाबत अमेरिकी राजदूतांकडून शोक
भाजपविरोधी पक्षांनी एकजूट करून इंडिया गटाची स्थापना मोठ्या उत्साहात केली असली तरी या आघाडीला गळती लागली आहे. ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये ‘एकला चलो रे’चा नारा दिला असताना, तिकडे बिहारमध्ये नितीश कुमार यांनी आघाडीचा हात सोडून भाजपशी हातमिळवणी केली आहे. तर, शनिवारीच ‘आप’ने पंजाबमध्ये एकट्याने लोकसभा निवडणुका लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय आघाडी समितीच्या अनेक बैठकांनंतरही आघाडीचा फॉर्म्युला अजूनही निश्चित झालेला नाही. आघाडी आणि जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेसला मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत राहुल गांधी यांचीही आवश्यकता आहे. त्यामुळे ही यात्रा लवकर संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.