आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता राष्ट्रीय पातळीवर पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेसोबतच राहुल गांधी यांनी परिधान केलेल्या टी-शर्टची सध्या जोरदार चर्चा आहे. या यात्रेत राहुल गांधी हे नेहमीच्या कुर्ता- पायजमामध्ये न दिसता टी-शर्ट आणि पँटमध्ये दिसत आहेत. शिवाय त्यांचं टी-शर्ट आणि शूज याची किंमत किती असेल याच्या चर्चा सुरू आहेत.
भाजपाने आपल्या ट्विटर हँडलवरून राहुल गांधी यांच्या टी-शर्टची किंमत सांगितली आहे. राहुल गांधी यांचा टी-शर्ट घातलेला एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोत बाजूला तशाच टी-शर्टचा फोटोही पोस्ट केला आहे. तसेच तो टी-शर्ट कोणत्या ब्रँडचा आहे आणि त्या टी-शर्टची किंमत किती आहे हे सुद्धा त्यात लिहिलं आहे.
राहुल गांधी यांनी ब्रिटिश लग्जरी फॅशन ब्रँड Burberryचा पोलो टी-शर्ट घातला असून त्याची किंमत ४१ हजार २५७ रुपये आहे, असं भाजपाने केलेल्या ट्विटमध्ये दिसून येत आहे.
Bharat, dekho! pic.twitter.com/UzBy6LL1pH
— BJP (@BJP4India) September 9, 2022
हे ही वाचा:
विसर्जन घाटावर जनरेटरची वायर तुटून ११ भाविक जखमी
चीनचे सैनिक या भागातून चाललेत मागे
राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा दुखवटा
याकुब मेमन कबर प्रकरणात मुख्यमंत्री काय म्हणाले?
यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीही प्रतिक्रिया दिली असून त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, “१९७१ साली राहुलजींच्या आजीने “गरिबी हटाव” चा नारा दिला होता. देशाची गरीबी हटली की नाही माहित नाही पण राहुलजींची मात्र नक्की हटली,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे.
१९७१ साली राहुलजींच्या आजीने "गरिबी हटाव" चा नारा दिला होता.
देशाची गरीबी हटली की नाही माहित नाही पण राहुलजींची मात्र नक्की हटली. pic.twitter.com/w7SvpkkZjU— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 9, 2022