राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या शुभेच्छांवरून सोशल मीडियावर खरपूस टीका होत आहे.
राहुल गांधी यांनी केवळ तीन शब्दांतच पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय, या शुभेच्छा देताना मोदींना ते ट्विट टॅगही केलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर राहुल गांधींच्या कोत्या मनोवृत्तीवर आसूड ओढले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारी ७१वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त देशभरातून शुभेच्छासंदेश देण्यात येत आहेत. अनेकांनी मोदींना दीर्घायुष्य चिंतिले आहे तसेच त्यांच्या देशकार्याचे कौतुकही केले आहे. पण राहुल गांधी यांनी केवळ हॅप्पी बर्थडे, मोदीजी एवढ्या शुभेच्छा देत ट्विट आटोपले आहे.
त्यावर अनेकांनी टीका करत नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या ट्विटची लिंक जोडली आहे. त्यात नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना उत्तम आरोग्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच राहुल गांधी यांना टॅगही केले आहे. मात्र राहुल गांधींनी केवळ एक उपचार म्हणून ट्विट केल्याची भावना आता व्यक्त होत आहे.
हे ही वाचा:
शिवसेना आणि जावेद अख्तर यांचे सेटिंग जुने आहे
विराट कोहलीने केले होते रोहित शर्माला डावलण्याचे प्रयत्न
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छासंदेश
राहुल गांधी सातत्याने द्वेष करू नका असा संदेश देशभर देत असतात पण त्यांच्या या कृतीतून द्वेषभावना झळकत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
Happy birthday, Modi ji.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 17, 2021
देशभरातून अनेक मान्यवरांनी शुक्रवारी नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मोदी यांना शुभेच्छा संदेश पाठविला आहे.
नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी तो दिवस नकारात्मक पद्धतीने काँग्रेसकडून साजरा केला जात आहे. त्यातूनही मोदींप्रती असलेली द्वेषभावना दिसून येते आहे.