काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे गेल्या अनेक महिन्यांपासून भारत जोडो यात्रेवर आहेत. देशातील अनेक राज्यात त्यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून दौरे केले आहेत. मात्र, आता या यात्रेला नऊ दिवसांचा ब्रेक लागणार आहे. हा ब्रेक नवीन वर्ष साजरा करण्यासाठी राहुल गांधी यांनी घेतला आहे का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
भारत जोडो यात्रा २४ डिसेंबरला दिल्लीमध्ये पोहचणार आहे. त्यानंतर २४ डिसेंबर ते २ जानेवारी पर्यंत नऊ दिवसांचा भारत जोडो यात्रा ब्रेक घेणार आहे. पुढे ३ डिसेंबर रोजी यात्रा पुन्हा पूर्ववत होईल. भारत जोडो यात्रेच्या ताफ्यातील ६० कंटेनरची दुरुस्ती आणि सर्व्हिसिंगसाठी ब्रेक घेतला असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
मात्र, गेल्या काही वर्षांवर नजर टाकली तर राहुल गांधी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दरम्यान अनेकदा परदेश दौऱ्यांवर गेले आहेत. त्यामुळे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी त्यांनी भारत जोडो यात्रेलाही ब्रेक दिला असल्याचा दावा केला जातं आहे.
हे ही वाचा:
नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी तयार राहा, म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक
काँग्रेसची गलिच्छ मानसिकता; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचे केले आवाहन
‘निर्भया फंडातून मिळालेल्या गाड्या सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, वडेट्टीवार यांनी वापरल्या’
राहुल गांधी ख्रिसमसमध्ये कुठे असणार याबाबत काँग्रेसकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे ते परदेशी दौऱ्यावर जाणार, अशीच चर्चा रंगली आहे. यापूर्वीच्या परदेशी त्यांच्या दौऱ्यांना काँग्रेसने वैयक्तिक दौरा म्हटले असले तरी राहुल गांधी नवीन वर्षाची पार्टी साजरी करण्यासाठी परदेशात जातात असाचं दावा केला जातो. २०२१ मध्येही राहुल गांधी नववर्षापूर्वी परदेश दौऱ्यावर गेले होते, तर काँग्रेसने याला खासगी दौरा म्हटले होते. अशा वेळी भारत जोडो यात्रेच्या नऊ दिवसांच्या ब्रेकमध्ये राहुल गांधी पुन्हा परदेश दौऱ्यावर जाणार आहेत का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.