33 C
Mumbai
Monday, November 18, 2024
घरराजकारणराहुल गांधी पुन्हा वायनाडमधूनच लढणार

राहुल गांधी पुन्हा वायनाडमधूनच लढणार

काँग्रेसची ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Google News Follow

Related

काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ३९ उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली असून राहुल गांधी हे पुन्हा केरळमधील वायनाड मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी शुक्रवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. काँग्रेसच्या पहिल्या यादीत उत्तर प्रदेशचा समावेश नसल्याने ते त्यांचा जुना मतदारसंघ अमेठीतून निवडणूक लढवणार की नाही, याबाबत अजूनही समजू शकलेले नाही.

हे ही वाचा:

पाचव्या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत

रोहित पवारांना ईडीचा झटका, बारामती अ‍ॅग्रो संबंधित कारखान्याची मालमत्ता जप्त!

पंतप्रधान मोदींना नोबेल शांतता पुरस्कार द्या!

रोहित-शुभमनच्या शतकांनी अनेक विक्रम मोडित

राहुल गांधी यांनी सन २००४च्या निवडणुकीत अमेठीतूनच आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता. त्यांनी ही जागा तिसऱ्यांदा जिंकली होती. मात्र सन २०१९मध्ये भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी वायनाडमधून विजयाची नोंद केली.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत भूपेष बघेल, के. मुरलीधरन, केसी वेणुगोपाल आणि शशी थरूर या मान्यवरांचाही समावेश आहे. माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे छत्तीसगढमधील राजनंदगावमधून लढतील, तर, ताम्रध्वज साहू महासामुंद, ज्योत्स्ना महंत कोरबातून, शिवकुमार देहरिया जांजगिर-चंबा जागेवरून लढतील.

कर्नाटकमधून सात जागांची घोषणा झाली आहे. त्यात बिजापूरमधून एचआर अल्गुर राजा, हावेरीमधून आनंदस्वामी गड्डाडेवरा मा, शिमोगामधून गीता शिवराजकुमार, हासनमधून एम. श्रेयस पटेल, तुमकुरमधून एसपी मुद्हनुमेगोवडा, मंड्यामधून वेंगटारामेगोवडा आणि बेंगळुरू ग्रामीणमधून डीके सुरेश यांची निवड झाली आहे. केरळमधील थ्रिसूरमधून के. मुरलीधरन, आलाप्पुझा येथून केसी वेणुगोपाल आणि थिरुवनंतपूरममधून शशी थरूर नशीब आजमावणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा