काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना त्यांचा सरकारी बंगला आज सोडावा लागला. शनिवारी त्यांनी नवी दिल्लीतील १२ तुघलक रोडच्या बंगल्याच्या चाव्या लोकसभा सचिवालयाकडे सुपूर्द केला. दोन दशकापासून राहुल गांधी या बंगल्यात राहात होते. आता त्यांनी आपल्या सगळ्या सामानसुमानासह बंगला सोडला आहे.
खासदार म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांना बंगला सोडणे भाग होते. सूरत दंडाधिकाऱ्यांनी त्यांना दोषी धरत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. सगळे मोदी चोर कसे असतात, असा सवाल राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील प्रचारसभेत विचारला होता. त्याविरोधात आपल्या समाजाची बदनामी झाल्याच्या आरोपाखाली पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती.
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची सदस्यता रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना सरकारी निवासस्थान सोडणे भाग असते. एका महिन्याच्या कालावधीत हे निवासस्थान सोडावे लागते. यावर राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियांका गांधी म्हणाल्या की, माझ्या भावाने जे काही सांगितले ते सत्य आहे. सरकारबद्दल तो सत्यच बोलत आला आहे. त्याचा हा त्रास होत आहे. पण आम्ही घाबरणार नाही.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरचे सांगिओटे गाव ईद साजरी करणार नाही!
साईभक्तानो शिर्डीत साईबाबाला हार, फुले अर्पण करा!
खारघर मध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र !
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केरळ दौऱ्याच्या आधी आत्मघातकी हल्ल्याची धमकी
सरकारी निवासस्थान सोडल्यानंतर राहुल गांधी आता सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. १० जनपथ येथे सोनिया गांधी यांचे निवासस्थान आहे. सरकारी निवासस्थानातून सामान घेऊन जाणारा ट्रक दिसला आहे.
#WATCH | Delhi: Trucks leave from Rahul Gandhi's 12 Tughlak Lane bungalow as he vacates the residence after his disqualification as a Lok Sabha MP. pic.twitter.com/CEvWhMeev9
— ANI (@ANI) April 22, 2023
राहुल गांधी यांनी शिक्षेविरोधात सुरत सत्र न्यायालयात दाद मागितली होती पण ती याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा खासदारकी पुन्हा मिळण्याचे राहुल गांधी यांचे स्वप्न तूर्तास भंगले आहे. आता राहुल गांधी हे गुजरात उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
२२ एप्रिलपर्यंत हे निवासस्थान सोडण्याची नोटीस लोकसभा सचिवालयाने पाठवली होती. त्यानुसार राहुल गांधी यांना हा बंगला सोडावा लागला आहे सत्य बोलल्याची ही शिक्षा आहे बंगला दिल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, भारताच्या लोकांनी मला हे घर १९ वर्षे दिले. मी त्यांचा आभारी आहे. सत्य बोलल्याची ही शिक्षा आहे. खरे बोलण्यासाठी मी कोणतीही किंमत चुकविण्यास तयार आहे.