‘या’ कारणासाठी राहुल गांधी होत आहेत ट्रोल

‘या’ कारणासाठी राहुल गांधी होत आहेत ट्रोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग होत आहे. पाँडीचेरी येथे आपल्या भाषणात केलेल्या एका विधानामुळे गांधी यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

राजकीय नेते आणि ट्रोलिंग हे समिकरण काही नवीन नाही. सोशल मीडियावर होणारे राजकीय नेत्यांचे ट्रोलिंग ही नित्याचीच बाब आहे. अशाच रोज ट्रोल होणाऱ्या काही राजकीय नेत्यांमधे राहुल गांधींचा क्रमांक खुप वरचा लागतो. अनेकदा ट्रोलिंगसाठी मुद्देही ते स्वतःच पुरवतात. असाच एक नवा फुलटाॅस राहुल गांधींनी आपल्या विरोधकांना दिला आहे. पाँडीचेरी येथे भाषण करताना मासेमारी करणाऱ्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय असावे असे मत त्यांनी व्यक्त केले आणि यामुळेच त्यांना ट्रोल केले जात आहे.

हे ही वाचा:

पूजा चव्हाण प्रकरणात अरुण राठोडला अटक

पाँडीचेरी येथे मासेमारी करणाऱ्या नागरीकांसमोर राहुल गांधी बोलत होते. तेव्हा बोलताना त्यांनी शेतकरी कायद्यांचा विषय काढला. पुढे ते म्हणाले “तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की मी मासेमारी करणाऱ्यांच्या मिटींग मधे शेतकरी कायद्यांविषयी का बोलतोय. पण माझ्यासाठी तुम्हीही समुद्रातले शेतकरी आहात.जर जमिनीवरच्या शेतकऱ्यासाठी दिल्लीत मंत्रालय आहे तर समुद्रातल्या शेतकऱ्यासाठी का नाही?”

राहुल गांधीच्या या विधानाने सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जाऊ लागली कारण नरेंद्र मोदी सरकारने २०१९ सालीच या मंत्रालयाची स्थापना केली आहे. या खात्याचे मंत्री गिरीराज सिंह यांनी स्वतः ट्विट करत राहुल गांधींना उत्तर दिले. या नंतर भारतीय जनता पार्टीच्या अनेक मंत्री आणि नेत्यांनी राहुल गांधी यांना चांगलेच सुनावले.

Exit mobile version