28 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरक्राईमनामाकुलगुरूंच्या नियुक्ती प्रक्रियेवरील भाष्य राहुल गांधींना भोवणार; कारवाईची मागणी

कुलगुरूंच्या नियुक्ती प्रक्रियेवरील भाष्य राहुल गांधींना भोवणार; कारवाईची मागणी

संयुक्त निवेदन असलेल्या पत्रावर १८० कुलगुरू आणि शिक्षणतज्ञांच्या स्वाक्षऱ्या

Google News Follow

Related

एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. देशातील जवळपास २०० विद्यापीठांच्या कुलगुरूंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विद्यापीठांच्या कुलगुरूंनी एक संयुक्त निवेदन जारी करून राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. राहुल गांधी यांनी कुलगुरूंच्या नियुक्ती प्रक्रियेवर भाष्य केले होते.

राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी विधान केले होते की, “देशातील सर्व विद्यापीठाचे कुलगुरू अपात्र आहेत. केवळ एका विशिष्ट विचारधारेच्या संघटनेचे म्हणून यांची निवड झाली आहे.” यानंतर देशातील काही विद्यापीठाच्या कुलगुरूंनी निषेध नोंदवत पत्र लिहिले आहे. संयुक्त निवेदनात कुलगुरू आणि इतर वरिष्ठ शिक्षणतज्ञांनी राहुल गांधी यांचे वक्तव्य फेटाळून लावले आहे. गुणवत्तेच्या आधारावर कुलगुरूंच्या नियुक्तीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, कुलगुरू आपल्या कामात संस्थांचा सन्मान आणि नैतिकतेची काळजी घेतात. जागतिक क्रमवारीवर नजर टाकल्यास भारतीय विद्यापीठांमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत, असेही या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, संयुक्त निवेदन असलेल्या पत्रावर १८० कुलगुरू आणि शिक्षणतज्ञांच्या स्वाक्षऱ्या आहेत. स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, एनसीआयआरटी, नॅशनल बुक ट्रस्ट, एआयसीटीई, यूजीसी इत्यादी प्रमुखांचाही समावेश आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतांनी पुन्हा पातळी सोडली; सत्ताधाऱ्यांवर आक्षेपार्ह, शिवराळ भाषेत टीका

‘पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग; मात्र लोकांना ते विसरायला लावले’

इस्रायलने बंद केले अल जजीराचे कार्यालय!

‘भाजपला मदत करण्यासाठी हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला’

राहुल गांधी यांनी काय वक्तव्य केले होते?

चार-पाच महिन्यांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील विद्यापीठांच्या कुलगुरूंबाबत मोठे वक्तव्य केले होते. काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. देशातील सर्व विद्यापीठाचे कुलगुरू अपात्र आहेत. यांना काहीच येत नाही. केवळ एका विशिष्ट विचारधारेच्या संघटनेचे म्हणून यांची निवड झाली आहे. हे फक्त त्यांच्या विचाराचे पाईक असल्याने त्यांची निवड झाल्याची टीका राहुल गांधी यांनी केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा