राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झालेली आहे. मंगळवार, २० एप्रिल रोजी राहुल गांधी यांनी या संबंधीची माहिती देशाच्या जनतेला दिली. मंगळवारी दुपारी ट्विट करत त्यांनी आपण कोविड पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले.

भारतात सध्या कोरोनाचा उद्रेक झाला असून दिवसाला लक्षावधी लोक कोविडच्या कचाट्यात येत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मंगळवारी कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती त्यांनी दिली. “कोविडची काही सौम्य लक्षणे आढळून आल्यानंतर मी स्वतःची चाचणी करून घेतली आणि त्यात मी कोविड पॉझिटिव्ह आलो आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत.” असे आवाहन त्यांनी केले आहे.

हे ही वाचा:

आणखी कडक निर्बंध लादण्याची गरज

फडणवीसांचा एक फोन आणि महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस

नवे निर्बंध, नवे नियम

रुग्णवाढीत नोंदली गेली किंचित घट

दोन दिवसात कोविडच्या कचाट्यात आलेले राहुल गांधी हे काँग्रेसचे दुसरे बडे नेते ठरले आहेत. सोमवारी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे कोविड पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत राहुल गांधी यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. लोकसभेचे खासदार राहुल गांधी यांच्या सुदृढ स्वास्थ्यासाठी आणि त्यांची प्रकृती जलद गतीने सुधारावी यासाठी मी प्रार्थना करतो असे पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version