अशोक गेहलोत यांना राहुल गांधींचा इशारा
अनेक राज्यांमध्ये गळती लागलेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या चर्चा होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘वन मॅन वन पोस्ट’ला पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे त्यांचा हा पाठींबा म्हणजे राहुल गांधी यांनी अशोक गेहलोत यांना मोठा इशारा दिल्याचे म्हटले जात आहे.
राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी केरळमध्ये बोलताना सांगितले की, उदयपुरमध्ये दिलेले वचन ‘वन मॅन वन पोस्ट’ हे पूर्ण करणार आहे. अशोक गेहलोत यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याच्या चर्चा आहेत. शिवाय अशोक गेहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास मुख्यमंत्रिपद सोडावे लागेल, असे संकेत राहुल गांधी यांनी दिल्याचे आता म्हटले जात आहे.
हे ही वाचा:
२३ सप्टेंबर : पाकिस्तानला धूळ चारणारा दिवस
अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?
… आणि पंतप्रधान मोदींनी परभणीच्या चिमुरडीला पाठवलं पत्र
‘ज्यांना दूध पाजले म्हणता त्या शिवसैनिकांचा त्याग, मेहनत आहे पक्षवाढीत’
काँग्रेस नेते शशी थरूर आणि अशोक गेहलोत हे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी शर्यतीत आहेत. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधींच्या म्हणण्यानुसार, ज्याला पाहिजे तो उमेदवार निवडणूक लढवू शकतो. पक्ष कोणाचेही नाव पुढे करणार नाही. तर दुसरीकडे अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी निवडणूक लढण्याला नकार दिला आहे.