राहुल गांधी बरळले, उत्तरेवर घसरले

राहुल गांधी बरळले, उत्तरेवर घसरले

केरळच्या थिरुवनंतपुरम येथे निवडणूक रॅलीच्या वेळी पूर्व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर भारताविरुद्ध आक्षेपार्ह उद्गार काढल्याची टीका भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केली आहे.

केरळच्या विधानसभा निवडणूक काही आठवड्यावर आल्या असताना राहुल गांधी केरळमध्ये एका प्रचारसभेत असं म्हणाले की, “पहिली पंधरा वर्ष मी उत्तर भारतातून खासदार म्हणून निवडून गेलो. त्यामुळे मला एका वेगळ्या प्रकारच्या राजकारणाची सवय झाली होती. आता केरळमध्ये आल्यावर मला खूप प्रसन्न वाटतंय कारण इथे लोकांना निवडणुकीच्या मुद्द्यांमध्ये रस असतो आणि केवळ वरवरच्या मुद्द्यावर नाही तर तपशिलात रस असतो. अलीकडेच मी विद्यार्थ्यांना सांगत होतो की मी खरोखर केरळ आणि वायनाडमध्ये आनंदी आहे. हे केवळ तुम्ही दाखवलेल्या आपुलकीमुळे नाही तर तुम्ही ज्या बुद्धिमत्तेने राजकारण करता त्यामुळे आहे.”

हे ही वाचा:

लडाखच्या खासदाराने उडवली राहुल गांधींची खिल्ली! म्हणाले…

राहुल गांधी हे २००४ ते २०१९ मध्ये उत्तर प्रदेशच्या अमेठीचे खासदार होते. अमेठी आणि रायबरेली या दोन लोकसभेच्या जागा गांधी कुटुंबाच्या पारंपरिक जागा मानल्या जातात. यातील रायबरेलीमधून आजही सोनिया गांधी पंतप्रधान म्हणून निवडून येतात. २०१९ मध्ये भाजपाच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना अमेठीमध्ये धूळ चारली होती. याचा कदाचित पराभवाचा अंदाज येऊनच राहुल गांधींनी केरळच्या वायनाड मतदार संघातून निवडणूक लढवली होती. वायनाड मतदारसंघामध्ये ५०% मुस्लिम लोकसंख्या आहे. वायनाडमधून राहुल गांधी सहज निवडून आले होते.

Exit mobile version