राहुल गांधींनी पुन्हा तेच आरोप उगाळले

पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी नेहमीच्याच आरोपांना दिला उजाळा

राहुल गांधींनी पुन्हा तेच आरोप उगाळले

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर प्रथमच पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा तेच नेहमीचेच आरोप उगाळले. अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा काय संबंध आहे, देशातील लोकशाही संपुष्टात आली आहे, मी लढत राहणार, मी प्रश्न विचारत राहणार, मी सावरकर नाही मी गांधी ही नेहमीचीच वक्तव्ये त्यांच्या या पत्रकार परिषदेत ऐकायला मिळाली.

सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेच्या सचिवालयातर्फे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होईल, याची नोटीस देण्यात आली. त्यानंतर देशभरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने सुरू केली आहेत. त्याच दरम्यान राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते पण राहुल गांधी यांनी नवे काही न सांगता नेहमीचेच आरोप केले.

हे ही वाचा:

परदेशातल्या खलिस्तान समर्थकांचे पासपोर्ट होऊ शकतात रद्द, नातेवाईकांवरही कारवाई

केरळच्या महिलेने राहुल गांधींसाठी सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव

मी महाराष्ट्राची मुलगी, आज माहेरी आल्यासारखे वाटते आहे!

ओमानमधील भर कार्यक्रमात झाकीर नाईकने हिंदू महिलेला केले धर्मांतरित

मी शांत राहणार नाही. लोकशाहीचा अंत झाला आहे. अदानी यांनी २० हजार कोटी कुठून आणले. संरक्षण मंत्रालय याबाबत का बोलत नाही. मी लोकांमध्येच राहणार आहे. माझा मुद्दा क्लिअर आहे. मी प्रश्न विचारत राहणार असे राहुल गांधी यांनी पुन्हा पुन्हा सांगितले. त्यांच्या भाषणात नव्या मुद्द्यांचा अभाव दिसला. एका पत्रकाराने प्रश्न विचारला की राहुल गांधी यांनी माफी मागावी असा मुद्दा भाजपाकडून उपस्थित केला जातो, त्यावर राहुल गांधी यांनी नेहमीचाच संवाद फेकला. माझे नाव सावरकर नाही, गांधी आहे.

राहुल गांधी असेही म्हणाले की, मी मोदींवर प्रश्न विचारत नाहीए तर मी अदानींवर प्रश्न उपस्थित करत आहे. राहुल गांधी यांनी त्याआधी पंतप्रधान मोदी आणि अदानी यांचा संबंध काय, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे राहुल गांधी यांना नेमके म्हणायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला.

भाजपाचे पत्रकार आहात का?

राहुल गांधींना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, तुम्ही ओबीसी समाजाचा अपमान केला असा आरोप भाजपाकडून होतोय. त्यावर राहुल गांधी भडकले. लोकशाहीची भाषा करताना त्यांनी म्हटले की, तीन ठिकाणाहून असा प्रश्न आला. तुम्ही एवढे भाजपासाठी काम का करताय. तुम्हाला आदेश दिले आहेत का, तुम्ही जर भाजपासाठी काम करत असाल तर तसा बिल्ला छातीवर लावा आणि मला विचारा. पत्रकार म्हणू नका.

Exit mobile version