‘राहुल गांधी, सोनिया गांधींनी चिनी कम्युनिस्ट पार्टीशी असा कोणता करार केला?’

पत्रकार सलाउद्दीन शोएब चौधरी यांनी विचारला गंभीर प्रश्न

‘राहुल गांधी, सोनिया गांधींनी चिनी कम्युनिस्ट पार्टीशी असा कोणता करार केला?’

बांगलादेशातील पत्रकार सलाउद्दीन शोएब चौधरी यांनी गेल्या काही दिवसांत गांधी कुटुंबियांना आपले लक्ष्य केले आहे. आता त्यांनी एका आरटीआयच्या माहितीद्वारे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी चीनशी केलेल्या कराराची माहिती समोर आणली आहे.

त्यांनी ९ सप्टेंबरला केलेल्या ट्विटमध्ये म्हटलले आहे की, अँटोनिया मायनो आणि राउल विन्ची, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आपण चीनच्या कम्युनिस्ट पार्टीसोबत २००८मध्ये जो करार केलात त्यात दोन अत्यंत गंभीर मुद्दे समाविष्ट आहेत.

सलाउद्दीन यांनी म्हटले आहे की, काँग्रेस आणि चीन यांच्यात झालेल्या करारानुसार . दोन देशात सेनादले आणि लष्कराकडून कोणती साधनसामुग्री खरेदी केली जाते, याची माहिती द्या, अशी अट त्या करारात होती. चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने काँग्रेसला निवडणुकीसाठी निधी उपलब्ध करून देणे.

हे ही वाचा:

राहुल गांधींचा अजब दावा… भारतात शिखांना पगडी, कडे घालू द्यायचे की नाही, यावरून संघर्ष!

पॅरिस पॅरालिम्पिक पदक विजेत्यांवर बक्षिसांचा पाऊस!

अजित पवार म्हणतात, अमित शहांसमोर मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला नाही

७० किलो वजनाचे सिमेंटचे ब्लॉक टाकून मालगाडी उलटवण्याचा कट !

सलाउद्दीन यांनी आपल्या या संदेशात म्हटले आहे की, आरटीआयद्वारे ही जी माहिती समोर येते आहे, ती खोटी असल्यास त्या परस्पर सामंजस्य कराराची प्रत उपलब्ध करून द्यावी. सलाउद्दीन यांनी अशीही मागणी केली आहे की, यासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्वरित कारवाई सुरू करावी. या सगळ्याची उच्च स्तरीय चौकशी व्हावी. शिवाय, आता ही वेळ आली आहे की, काँग्रेसमधील जे सायबर गुन्हेगार सोशल मीडिया, व्हीडिओ शेअर करणारी यंत्रणा आणि विकिपीडियात आहेत आणि जे सत्य दडवून ठेवत आहेत, त्यांना ओळखणे आवश्यक आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना अटक करण्यात यावी आणि त्यांची चौकशी करून ही कराराची प्रत त्यांच्याकडे असल्यास ती शोधून काढावी.

Exit mobile version