‘राहुुल गांधी यांनी अखंड भारत यात्रा काढावी तिही पाकिस्तानातून’

आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्वशर्मा यांनी केली बोचरी टीका

‘राहुुल गांधी यांनी अखंड भारत यात्रा काढावी तिही पाकिस्तानातून’

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेला बुधवारी प्रारंभ झाला. तामिळनाडू येथील कन्याकुमारीपासून ही यात्रा सुरू झाली पण त्यावर आसामचे मुख्यमंत्री आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी हिमांत विश्वशर्मा यांनी बोचरी टीका केली आहे.

हिमंता यांनी म्हटले आहे की, भारताची फाळणी १९४७मध्ये झाली. ही फाळणी काँग्रेसमुळे झाली. त्यामुळे त्यांनी भारत जोडो यात्रा काढू नये. त्यांनी काढायचीच असेल तर पाकिस्तानातून यात्रा काढावी.

भारत जोडो यात्रेबाबत विश्वशर्मा म्हणाले की, १९४७मध्ये काँग्रेसच्या काळात भारताची फाळणी झाली. जर राहुल गांधी यांना खरोखरच भारत जोडो आंदोलन करायचे असेल तर त्यांनी पाकिस्तानातून त्याची सुरुवात करावी. भारतात अशी यात्रा सुरू करून उपयोग काय? भारत हा आधीच एकत्र आहे. त्यांनी पाकिस्तानातून ही यात्रा सुरू करत पाकिस्ताना आणि बांगलादेश या देशांना भारताशी जोडावे. एकूणच त्यांनी अखंड भारतच्या दिशेने पाऊल टाकावे. हिमंता म्हणाले की, भारत आधीच काश्मीर ते कन्याकुमार पर्यंत जोडला गेलेलाच आहे. आता एकत्र आणण्यासाठी आणखी काही करण्याची गरज नाही.

हे ही वाचा:

अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख भाजपाच्या वाटेवर

जपानमध्ये बाप्पाचं धुमधडाक्यात स्वागत

उमाजी नाईकांनी इंग्रजांविरोधात प्रसिद्ध केला होता जाहीरनामा

बाप्पाचं आधारकार्ड पाहिलंत का?

हिमंता यांनी ट्विटरवरही काँग्रेसच्या या आंदोलनाची खिल्ली उडविली. भारत जोडो यात्रा म्हणजे या शतकातील एक विनोद आहे. याआधी १९४७मध्ये भारताचे विभाजन झाले कारण काँग्रेसची त्यासाठी तयारी होती.

त्यावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या. २०२४मधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी यांनी या यात्रेचे आयोजन केले आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ३५७० किमी हे अंतर ते १५० दिवसांत पूर्ण करणार आहेत.

Exit mobile version