केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे त्यांच्या भाषण आणि कवितांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोलाचा सल्ला दिला आहे. “राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि ‘हम दो हमारे दो’ याची अंमलबजावणी करावी.” असा सल्ला रामदास आठवलेंनी राहुल गांधींना दिला. पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर ‘हम दो हमारे दो’ असे सरकारचे धोरण असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना आठवले म्हणाले, “राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि ‘हम दो हमारे दो’ याची अंमलबजावणी करावी.”
काँग्रेसनेही जाहीरनाम्यात शेतकरी कायद्याचे वचन दिले होते, याची आठवण आठवले यांनी करून दिलीय. शेतकरी आंदोलनावर बोलताना आठवले यांनी दिल्लीमधील शेतकरी हे आंदोलन ताणत असल्याची टीका त्यांनी केली. सरकार चर्चेला तयार आहे, पण कायदेच मागे घ्या, ही शेतकऱ्यांची भूमिका असंवैधानिक असल्याची टीकाही त्यांनी केली.
२०० शेतकऱ्यांच्या मृत्यूला आंदोलनकारी जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. तिरंग्याचा अपमान दुर्दैवी आहे. शेतकरी आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा काही सहभाग नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान पुण्यात आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाण यांच्या मृत्यूला कोणी जबाबदार असेल तर त्याची चौकशी करावी. असेही आठवले म्हणाले.