राहुल गांधींना अध्यक्ष करून काँग्रेसला वाचवा : संजय निरुपम

राहुल गांधींना अध्यक्ष करून काँग्रेसला वाचवा : संजय निरुपम

देशातील विविध निवडणुकांमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची घसरण काही थांबलेली नाही. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तर राहुल गांधी उतरलेही नाहीत. त्यामुळे तिथेही काँग्रेसची पार रया गेली. असे असतानाही मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेस वाचविण्यासाठी राहुल गांधी यांनाच अध्यक्ष करा, अशी मागणी केली आहे.

निरुपम म्हणतात की, करोनाच्या संकटामुळे लोकांना घरात थांबावे लागले आहे. अशावेळी आपल्या हास्यास्पद विधानांनी काँग्रेस नेता लोकांचे मनोरंजन करत आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत काँग्रेसची हालत अतिशय खराब झाली आहे. मात्र काँग्रेसला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांना तात्काळ पक्षाध्यक्ष बनवले पाहिजे, असे निरुपम यांनी  मत व्यक्त केले आहे.

हे ही वाचा:

योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी

एक जुलैपासून मुंबईतील शाळा सुरु होणार- शास्त्रज्ञ

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे निधन

ममतांच्या हिंसाचाराविरूद्ध भाजपाचे देशव्यापी धरणे आंदोलन

गेल्या काही निवडणुकांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचा वारू रोखण्याच राहुल गांधी यांना सपशेल अपयश आले आहे. तरीही निरुपम यांचा राहुल गांधी यांच्यावरचा विश्वास दांडगा आहे. पश्चिम बंगालमध्ये पक्षाचा एकही आमदार निवडून न येण्याबाबत दुःख व्यक्त करताना निरुपम यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकांना अजून तीन वर्ष बाकी आहेत. निवडणुकांच्या तयारीसाठी तीन वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना केवळ राहुल गांधीच करू शकतात. त्यामुळे पक्षाची सुत्रे लवकरात लवकर त्यांच्या हातात सोपवली पाहिजेत. निरुपम यांनी सांगितले की आज सगळा देश राहुल गांधींना नरेंद्र मोदी यांचा पर्याय म्हणून पाहत आहे. ते सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. त्यांच्या बोलण्याचे लोक कौतूक करत आहेत. त्यामुळे राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष केले पाहिजे. ते म्हणाले की गेली २ वर्षे काँग्रेसला पुर्णवेळ अध्यक्ष लाभलेला नाही. कोणत्याही पक्षासाठी हे योग्य नाही.

मागच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जबरदस्त पराभव झाला होता. त्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

Exit mobile version