30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणराहुल गांधींचा अजब दावा... भारतात शिखांना पगडी, कडे घालू द्यायचे की नाही,...

राहुल गांधींचा अजब दावा… भारतात शिखांना पगडी, कडे घालू द्यायचे की नाही, यावरून संघर्ष!

अमेरिकेत केले वक्तव्य, देशभरातून आश्चर्य आणि संताप व्यक्त

Google News Follow

Related

सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले राहुल गांधी आपल्या वक्तव्यांनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. यावेळी त्यांनी शिखांच्या वेशभूषेवरून नवा वाद निर्माण केला आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत म्हटले की, भारतात शिखांना पगडी घालण्यास परवानगी द्यायची की नाही, यावरून संघर्ष सुरू आहे. शिखांना कडे घालण्याची किंवा गुरुद्वारात जाण्याची परवानगी आहे की नाही? केवळ शीख धर्मातच नव्हे तर सर्व धर्मात ही बंधने आहेत.

विर्जिनिया येथील भाषणात राहुल गांधी यांनी हे अजब प्रश्न उपस्थित केले. खरे तर, शिखांना या वस्तू घालू दिल्या जात नाहीत, असा कोणताही प्रसंग घडलेला नाही. तरीही राहुल गांधी हे आरोप करत आहेत.

शाळांमध्ये शीख मुलांना फेटा घालू दिला जातो. विमानातही त्यांच्याकडे असलेले छोटे शस्त्र किर्पाण सोबत नेता येऊ शकते. त्यामुळे राहुल गांधी हे नेमका प्रश्न कशासंदर्भात विचारत आहेत, हे कळायला मार्ग नाही. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी याबाबत म्हटले की, शीखांना या सरकारच्या काळात जेवढे सुरक्षित वाटते आहे तेवढे यापूर्वी वाटत नव्हते.

हे ही वाचा:

धक्कादायक ! बापाने पाच वर्षाच्या पोटच्या मुलाला इमारतीवरून खाली फेकले, पण…

आंदोलन सोडा, दुर्गापूजेकडे लक्ष द्या…ममतांच्या वक्तव्यामुळे पीडितेच्या आईकडून संताप

अजित पवार म्हणतात, अमित शहांसमोर मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला नाही

७० किलो वजनाचे सिमेंटचे ब्लॉक टाकून मालगाडी उलटवण्याचा कट !

१९८४मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर शिखांवर अनेक हल्ले झाले. त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यात ३ हजार शिखांची हत्या झाली होती. शिखांना घराबाहेर काढून त्यांना जाळण्यात आले होते, असे पुरी म्हणाले. त्यावर बोलताना राजीव गांधी यांनी पुढे असे वक्तव्य केले होते की, जेव्हा मोठा वृक्ष उन्मळून पडतो तेव्हा जमीन हादरते.

भारतात लष्करात अनेक शीख जवान आणि अधिकारी आहेत, जे अभिमानाने पगडी परिधान करतात. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे पगडी परिधान करत असत. राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग हे पगडी परिधान करत असत. हरदीप पुरी म्हणतात की, १९८४च्या दंगलींमुळे माझ्या अनेक मित्रांनी दाढ्या आणि डोक्यावरील केस काढून टाकले कारण त्यांना भीती वाटत होती.

महत्त्वाचे म्हणजे राहुल गांधी यांच्यासाठी एका शिख व्यक्तीने एक्सवर राहुल गांधींना संदेश पाठवला की, हे माझे कडे आणि माझी पगडी. मला कुणीही ते घालण्यापासून रोखलेले नाही. मी भारतात आहे याचा मला आनंद आहे. तुमच्या विषारी उद्दिष्टांसाठी शिखांचा वापर करणे थांबवा. स्वतः राहुल गांधी यांनीदेखील पगडी घातलेले फोटो आता व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबला दिलेल्या भेटीत पगडी घातलेली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या दाव्यावर सर्व स्तरावर आश्चर्य व्यक्त होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा