काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे कायमच आपल्या पप्पूगिरीमुळे चर्चेत असतात. कधी ते भर संसदेत मिठी मारणे, डोळा मारणे असे प्रकार करतात. तर कधी जाहीर सभांमध्ये विनोदी वक्तव्य करतात. त्यांच्या या पप्पूगिरीची चर्चा कायमच माध्यमांमध्ये आणि समाजमाध्यमांमध्ये होत असते. पण यावेळी मात्र त्यांनी सार्याच मर्यादा ओलांडल्या. आपल्या मित्राच्या म्हणजेच राजीव सातव यांच्या शोकसभेतच राहुल गांधींची पप्पूगिरी पाहायला मिळाली.
काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे निधन झाले. सातव यांच्या जाण्याबद्दल समाजाच्या प्रत्येक स्तरातून दुःख व्यक्त होत असून महाराष्ट्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. बुधवार, १९ मे रोजी काँग्रेस पक्षातर्फे सातव यांची शोकसभा आयोजित करण्यात आली होती. व्हर्च्युअल माध्यमातून झालेल्या या शोकसभेला सातव यांचे कुटुंबीय तसेच काँग्रेसचे प्रमुख नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. या श्रद्धांजली सभेत बोलताना राहुल गांधी यांनी आपल्या पप्पूगिरीचे दर्शन पुन्हा एकदा घडवून दिले. सुरुवातीलाच त्यांनी जमलेल्या सर्व काँग्रेस नेत्यांचे आणि सातव यांच्या कुटुंबियांचे, ज्यात त्यांची आई, पत्नी आणि दोन लहान मुले होती त्यांचे स्वागत केले. अशा दुःखद प्रसंगी शोक व्यक्त करायला जमलेल्या लोकांचे स्वागत करायचे नसते याचे साधे भान राहुल गांधींना नव्हते किंवा याची माहितीच त्यांना नव्हती.
हे ही वाचा:
काँग्रेसकडून मोदी सरकारची नव्हे, देशाची बदनामी
समुद्राकडून ६७ हजार किलो कचरा साभार परत
मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, रासायनिक खतांच्या सबसिडीत १४०% वाढ
शेतकऱ्यांचे खरेखुरे मित्र पंतप्रधान मोदींचा खताबाबत शेतकऱ्यांना दिलासा
राहुल गांधींच्या या स्वागताच्या कृतीने सार्यांनाच धक्का बसला असणार, पण प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता कोणीही त्यावर व्यक्त झाले नाही. पण नेटकऱ्यांनी मात्र राहुल गांधींच्या या पप्पूगिरीचा चांगलाच समाचार घेतला आहे.