25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारणसंरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीवर राहुल गांधी

संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीवर राहुल गांधी

मार्चमध्ये अपात्र ठरवण्याआधी राहुल गांधी हे संरक्षण विभागाच्या संसदीय समितीचे सदस्य होते

Google News Follow

Related

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावाची बुधवारी संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीवर शिफारस करण्यात आली. संसदेतून अपात्र ठरण्यापूर्वी ते संसदीय संरक्षण समितीचे सदस्य होते. लोकसभेचे सदस्यत्व बहाल केल्यानंतर काही दिवसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बुधवारी संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीवर नामनिर्देशित करण्यात आले. काँग्रेसचे खासदार अमर सिंह यांचेही नाव समितीसाठी नामनिर्देशित करण्यात आले आहे.

 

 

आम आदमी पक्षाचे नवनिर्वाचित सदस्य लोकसभेचे सुशील कुमार रिंकू यांची कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. रिंकू यांनी अलीकडेच जालंधर लोकसभा पोटनिवडणूक जिंकली होती आणि ते लोकसभेतील आपचे एकमेव खासदार आहेत.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे फैजल पीपी मोहम्मद, यांचेही लोकसभा सदस्यत्व मार्चमध्ये पुनर्स्थापित करण्यात आले होते. त्यांना ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण समितीवर नामनिर्देशित करण्यात आले आहे. मार्चमध्ये अपात्र ठरवण्याआधी राहुल गांधी हे संरक्षण विभागाच्या संसदीय समितीचे सदस्य होते. ७ ऑगस्ट रोजी, गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व पुनर्स्थापित करण्यात आले होते. त्यांनी ‘मोदी आडनावावरून टिप्पणी केल्याबद्दल सन २०१९च्या मानहानीच्या खटल्यात सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते.

हे ही वाचा:

ताडदेव लूट तसेच वृद्धेच्या हत्येप्रकरणातील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

आज लोकसभा निवडणुका झाल्यास कोण मारणार बाजी?

डीआरडीओचे माजी महासंचालक डॉ. व्ही. एस. अरुणाचलम यांचे निधन

भारताकडून काहीतरी शिका, पाकिस्तानला चीनचा सल्ला!

 

तसेच, त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यानंतर काही दिवसांनंतरच गांधी यांना २४ मार्च रोजी लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले. दोन वर्षे आणि त्याहून अधिक शिक्षा दिल्याने आमदार आपोआप अपात्र ठरतो. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने त्यांना पुन्हा लोकसभेचे सदस्यत्व देण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा