राहुल गांधींच्या हाती पुन्हा काँग्रेसची सूत्रे?

राहुल गांधींच्या हाती पुन्हा काँग्रेसची सूत्रे?

भारतातही सर्वात जुना राजकीय पक्ष अशी ओळख असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची धुरा पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याकडे येणार का? या बद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. शनिवार, १६ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या कार्य समितीच्या बैठकीत ‘आपण अध्यक्षपद स्विकारण्या बाबत विचार करू’ असे राहुल गांधी म्हणाल्याचे माहिती मिळत आहे. एएनआय या वृत्त संस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.

आज काँग्रेस पक्षाच्या कार्य समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घ्यावीत या प्रकारचा सूर अनेक काँग्रेस नेत्यांनी आळवल्याचे समजत आहे. या आधीही अनेकदा काँग्रेसच्या निरनिराळ्या आघाड्यांकडून राहुल गांधी यांना अध्यक्ष पदाची सूत्रे सोपवण्यात यावीत या संदर्भातील निरनिराळे ठराव पारित करण्यात आले होते. यावरच राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत ‘आपण अध्यक्ष पद स्विकारण्याचा विचार करू’ असे म्हटल्याचे समजते. पण पक्षातीलच काही नेत्यांच्या मते राहुल गांधी यांनी सुरुवातीला पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष पद स्विकारावे अशा स्वरूपाचे आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यांकडे येणार का सरकारी पाहुणे?

लखबीर सिंगच्या निर्घृण हत्येप्रकरणी निहंग शीख ताब्यात

महाविकास आघाडी पुन्हा बंदची हाक देणार का?

वाझे तुरुंगात जाऊनही ठाकरे सरकारमध्ये महावसूली सुरूच

तर या बैठकीत सोनिया गांधी यांनी काँग्रेस मधील जेष्ठ बंडखोर नेत्यांना उद्देशून घणाघात केला आहे. ‘मी पक्षाची पूर्णवेळ अध्यक्षच आहे’ असे म्हणत सोनिया गांधी यांनी जी-२३ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंडखोर नेत्यांना फटकारले आहे. आगामी २०२२ या वर्षात काँग्रेस पक्षातील संघटनात्मक निवडणूक होऊ घातल्या आहेत. आजच्या कार्य समिती बैठकीत त्या संदर्भातील ठराव पारित करण्यात आला आहे. २१ ऑगस्ट २०२२ ते २० सप्टेंबर २०२२२ या कालावधीत काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणूक पार पडतील. त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची सूत्रे नेमकी कोणाकडे जाणार हे समजणार आहे.

 

Exit mobile version