काँग्रेस काळात गॅसचे दर होते अधिक! राहुल गांधींची कबुली

काँग्रेस काळात गॅसचे दर होते अधिक! राहुल गांधींची कबुली

देशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर सातत्याने टीका करणारे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष उघडा पडला आहे. नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत इंधनाचे, गॅसचे भाव वाढल्याचे सतत आरोप काँग्रेस पक्षाकडून होत असतात. पण मोदींपेक्षा काँग्रेसच्या काळातच गॅसचे भाव अधिक असल्याची कबुली खुद्द राहुल गांधी यांनी दिली आहे.

राहुल गांधी यांनी या संदर्भात एक ट्विट केले. ट्विटमधून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर एलपीजी सिलेंडरच्या किंमतीवरून टीका करण्याचा प्रयत्न केला. पण हा डाव त्यांच्यावरच उलटला आहे. कारण राहुल गांधी यांनी टाकलेल्या या ट्विटवरून हे स्पष्ट होते की काँग्रेस पक्षाची सत्ता असताना आजच्यापेक्षा अधिक गॅसचे भाव होते.

हे ही वाचा:

कुमार विश्वास यांनी देशातील जनतेला दिली एक गंभीर वॉर्निंग

म्हसळा जवळील घोणसे घाटात बस कोसळली दरीत

‘ठाकरे सरकराने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या’

शिवसेनेच्या ‘सोशल सैनिकांना’ संजय राऊतांचे शिव्यांचे धडे

राहुल गांधी यांच्या दाव्यानुसार २०१४ मध्ये जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत होता. तेव्हा गॅसचा दर जनतेसाठी ४१० रुपये होता. तर सरकार ८२७ रुपयांची सबसिडी देत होते.पण आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात २०२२२ मध्ये गॅसचे दर ९९९ इतके झाले आहेत. म्हणजे काँग्रेसच्या काळात ज्या किंमतीत दोन सिलेंडर मिळत होते. त्याच किंमतीत आता फक्त एक सिलेंडर मिळतो. पण हा आरोप करताना राहुल गांधी यांनी ही कबुली दिली आहे की काँग्रेसच्या काळात गॅसची एकूण किंमत म्हणजेच लोक देत असलेले पैसे आणि सरकारची सबसीडी मिळून ही १२३७ रुपये इतकी होती. जी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात असलेल्या किंमतीपेक्षा जास्त आहे.

राहुल गांधींच्या या ट्विटनंतर पुन्हा एकदा त्यांनी सेल्फ गोल केले असे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर राहुल गांधी यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले असून नेटकऱ्यांनी राहुल गांधींची पुन्हा एकदा खिल्ली उडवली आहे.

Exit mobile version