‘राहुल गांधी हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना’

‘राहुल गांधी हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना’

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत ते आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना आहेत, अशी उपरोधिक टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांना ‘आधुनिक जिना’ म्हणत हल्ला चढवला.

राहुल गांधींच्या संसदेतील नुकत्याच झालेल्या भाषणांचा उल्लेख करून, भाजपवर त्यांनी केलेल्या टीकेचा उल्लेख करत शर्मा म्हणाले की, जणू काही त्यांच्या अंगात जिनांचे भूत शिरले आहे. एक दिवसापूर्वी, त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागण्यावरून राहुल गांधींना खडे बोल सुनावले आहेत. उत्तराखंडमध्ये भाजपच्या एका निवडणूक रॅलीत त्यांनी गांधींवर हल्ला चढवला आहे.

काँग्रेस नेत्यावर केलेल्या टिप्पणीचे स्पष्टीकरण देताना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींची तुलना पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्याशी केली आहे. शर्मा म्हणाले की, राहुल गांधी यांची भाषा आणि वक्तृत्व १९४७ पूर्वीच्या जिनांच्या भाषेप्रमाणेच आहे. एक प्रकारे राहुल गांधी हे आधुनिक जिना आहेत, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

२०२२ मधील इस्रोची पहिली मोहीम फत्ते

नाना पटोलेंचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले

गोव्यात चालणार फडणवीसांची जादू?

काँग्रेसचे आंदोलन; भाजपा कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

तत्कालीन जनरल बिपीन रावत यांच्या नेतृत्वात लष्कराने पाकिस्तानवर हल्ला चढवला त्याचेही राहुल गांधी यांनी पुरावे मागितले होते. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले,” आमचे लष्करी जवान शत्रूच्या प्रदेशात कोणतीही कारवाई करण्यापूर्वी महिनाभर नियोजन करतात. ही एक धोरणात्मक कारवाई आहे आणि ऑपरेशननंतर प्रेस रिलीझ जारी केल्यानंतरच आम्हाला त्या कारवाईची माहिती मिळते. आता कारवाईबाबत कोणी पुरावे मागितले तर लष्कराच्या जवानाला किती वेदना झाल्या असतील याचा विचार करा. लष्करात सेवा बजावलेल्या उत्तराखंडच्या सुपुत्रावर तुमचा विश्वास नाही का? असा सवाल शर्मा यांनी राहुल गांधींना केला आहे.

Exit mobile version